शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीचा कचराप्रश्न हरित न्यायालयात

By admin | Updated: July 15, 2015 23:12 IST

आळंदी : इंद्रायणी नदीच्या पात्रालगत कचरा टाकणे, तो जागेवरच जाळणे किंवा तोच कचरा नदीत ढकलून देणे, नदीपात्रात सांडपाणी खुलेआम सोडून संपूर्ण इंद्रायणी नदीलाच प्रदूषित करणार्‍या विवध संस्थांसह संबंधित शासकीय कार्यालये व शासनाच्या विरोधात राष्ट्रीत हरित न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणी जलद गतीने सुनावणी सुरू आहे. याबाबत त्वरित निर्णय घेण्याच्या दृष्टीने आळंदी नगर परिषदेने गुरुवारी विशेष सभेचे आयोजन केले होते.

आळंदी : इंद्रायणी नदीच्या पात्रालगत कचरा टाकणे, तो जागेवरच जाळणे किंवा तोच कचरा नदीत ढकलून देणे, नदीपात्रात सांडपाणी खुलेआम सोडून संपूर्ण इंद्रायणी नदीलाच प्रदूषित करणार्‍या विवध संस्थांसह संबंधित शासकीय कार्यालये व शासनाच्या विरोधात राष्ट्रीत हरित न्यायालयात दावा दाखल करण्यात आला असून, सदर प्रकरणी जलद गतीने सुनावणी सुरू आहे. याबाबत त्वरित निर्णय घेण्याच्या दृष्टीने आळंदी नगर परिषदेने गुरुवारी विशेष सभेचे आयोजन केले होते.
आळंदी येथील संदीप कायस्थ यांनी दावा क्र. ६२/२१५ पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायालयात (नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल) दाखल केला असून, यात आळंदी नगर परिषद, पिंपरी-चिंचवड महापालिका, लोणावळा नगर परिषद, देहू ग्रामपंचायत, पुणे विभागीय आयुक्त, महाराष्ट्र शासन पर्यावरण विभाग, नगर विकास विभाग, जिल्हा परिषदेचा पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
दाखल करण्यात आलेल्या दाव्यामध्ये संदीप कायस्थ यांनी आळंदी न.प.द्वारे गोळा करण्यात आलेला कचरा स्मशानभूमीत टाकला जात असून, हा कचरा तिथेच नदीकाठी साठवला जातो, नदीत ढकलून दिला जातो, तिथेच जागेवर जाळला जातो, घनकचरा व्यवस्थापन कचरा कायदा २००० नुसार घन कचर्‍याचे व्यवस्थापन केले जात नाही, तसेच इंद्रायणी नदीच्या पात्रात आळंदी न.प. हद्दीतील,पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतील, लोणारा न.प., तळेगाव न.प., देहू ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सांडपाणी बेसुमार व खुले आम सोडले जाते. त्यामुळे इंद्रायणी नदी या सर्वच कारणांमुळे भयंकर प्रदूषित होत असल्याचे दाव्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत बांधण्यात आलेली शौचालये नागरिकांना वापरासाठी खुली करुन दिली जात नाही, असाही आक्षेप घेण्यात आला आहे. शिवाय तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत घेतलेल्या कुंड्या, कंटेनर, घंटागाड्या, झेटींग मशीन याचा वापर केला जात नाही. देवस्थानने न.प.ला ५ एकर जागा भा्याने उपलब्ध करुन दिली असली तरी, नगर परिषदेला जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्यापही ना हरकत प्रमाणपत्र दिले नसल्याचे दाव्यामध्ये नमुद करण्यात आले आहे. याबाबत दाव्यासोबत संदीप कायस्थ यांनी विविध ठिकाणची पुरावादर्शक छधायाचित्रेही दाखल केली आहेत.
सदर प्रकरणी पुणे येथील राष्ट्रीय हरित न्यायालयात सुनावणी सुरू असून यातील दोन सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर .... जोड....