शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या डॉक्टरसह तिघांचा दिल्लीजवळ अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 01:59 IST

मथुरा जिल्ह्यातील कैती गावानजिक यमुना एक्स्प्रेस-वेवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला व आणखी चार डॉक्टर गंभीर जखमी झाले.

नवी दिल्ली/आग्रा : मथुरा जिल्ह्यातील कैती गावानजिक यमुना एक्स्प्रेस-वेवर रविवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात अ.भा. आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला व आणखी चार डॉक्टर गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. हर्षद वानखडे (३४) यांचाही समावेश आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वानखडे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्व डॉक्टर दिल्ली येथून आग्रा येथे टाटा इनोव्हाने चालले होते. वानखडे स्वत: गाडी चालवत होते व बाकीचे झोपले होते.या अपघातात मरण पावलेल्या अन्य दोघांची नावे डॉ. यशप्रीत सिंग (२५), डॉ. हेमबाला (२४) अशी आहेत. याखेरीज डॉ. कॅथरिन हलम, डॉ. महेशकुमार, डॉ. जितेंदर मौर्य व डॉॅ. अभिनव सिंग हे चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी डॉ. कॅथरिनला डोक्याला दुखापत झाली आहे.>मथुरा येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना ‘एम्स’मध्ये हलविण्यात आले. डॉ. वानखडे यांनी कंटेनर ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला व त्यावेळी हा अपघात झाला. कंटेनरबरोबर इनोव्हा ३०० मीटर अंतरापर्यंत फरफटत गेली. इनोव्हा चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. कन्टेनरचा ड्रायव्हर व क्लीनर पळून गेले. मृतांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले असून ते आल्यावर उत्तरीय तपासणी करून मृतदेह ताब्यात दिले जातील, असेही पोलिसांनी सांगितले.