शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पद मिळताच अखिलेशच्या डोक्यात हवा गेली - मुलायमसिंह यादव

By admin | Updated: October 24, 2016 12:09 IST

समाजवादी पार्टी बनवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. लाठया खाल्ल्या आहेत. जे आज उडया मारत आहेत

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. २४ - समाजवादी पक्षामध्ये मुलगा अखिलेश आणि भाऊ शिवपाल यांच्यात सुरु असलेल्या संघर्षात पक्षाचे सर्वोच्च नेते मुलायमसिंह यादव यांनी भाऊ शिवपालची बाजू उचलून धरली आहे. पद मिळताच डोक्यात हवा गेली असा टोला त्यांनी अखिलेशला लगावला. 
 
माझ्यासाठी आणि समाजवादी पार्टीसाठी शिवपालने जे केले ते मी कधीच विसरु शकत नाही. शिवपाल समाजवादी पार्टीचा मोठा नेता आहे असे मुलायमसिंह यादव यांनी सांगितले. मी कमकुवत झालो आहे असा समज तुम्ही करुन घेऊ नका असा सूचक इशारा त्यांनी यावेळी दिला.
 
समाजवादी पार्टी बनवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. लाठया खाल्ल्या  आहेत. जे आज उडया मारत आहेत ते एक लाठीही खाऊ शकत नाहीत. समाजवादी पक्षात जो संघर्ष सुरु आहे त्याने खूप दु:ख झाले अशा शब्दात मुलायमसिंह यादव यांनी सध्या पक्षातंर्गत सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणावर आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 
आणखी वाचा 
 
लखनऊमध्ये पक्ष पदाधिका-यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. जर तुम्ही टीका सहन करु शकत नाही तर तुम्ही नेता बनू शकत नाहीत असे मुलायमसिंह म्हणाले. लोहीयाजींनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावरुन पुढे जा. आपल्यात ज्या त्रूटी आहेत त्या दूर करण्याऐवजी आपण आपसात भांडत बसलो असे मुलायम यांनी सांगितले. त्याचवेळी मुलायम यांनी शिवपाल यादव पक्षाचे मोठे नेते असल्याचे सांगून अखिलेश यादव यांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावला.