शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गरज पडल्यास मायावतींशी आघाडी करेन- अखिलेश यादव

By admin | Updated: March 9, 2017 21:29 IST

उत्तर प्रदेशात एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानं राजकीय नेत्यांचीही धडधड वाढली आहे.

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 9 - उत्तर प्रदेशात एक्झिट पोलची आकडेवारी समोर आल्यानं राजकीय नेत्यांचीही धडधड वाढली आहे. सत्तेत असलेल्या समाजवादी पक्षाला कोणत्याही परिस्थितीत पुन्हा सत्ता हस्तगत करायची आहे. त्यासाठी अखिलेश यादव यांनी गरज पडल्यास मायावतींशी युती करणार असल्याचं निकालांच्या आधीच जाहीर करून टाकलंय. समाजवादी पक्षाला संपूर्ण बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवटीपेक्षा मायावतींशी हातमिळवणी करणे पसंत करेन, असं मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले आहेत. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतल्या निकालानंतर सर्व पर्याय खुले असल्याचं जाहीर केले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल 11 मार्चला लागणार आहे.ते म्हणाले, उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट यावी, अशी कोणाचीही इच्छा नाही. भाजपाच्या हातात उत्तर प्रदेशचा रिमोट जाऊ नये, यासाठी मायावतींशीही युती करायला तयार असल्याचं अखिलेश यादव म्हणाले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्यापेक्षा बसपाठी युती करणं पसंत करेन, असे संकेतही अखिलेश यादव यांनी दिले आहेत. उत्तर प्रदेशच्या राजकारणात शत्रू असलेले अखिलेश यादव आणि मायावती निवडणुकांनंतर सत्तेसाठी एकत्र येणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (Exit Poll: उत्तर प्रदेशमध्ये 26 वर्षांनी फुलणार कमळ)मुलायम सिंहांबद्दल छेडले असता अखिलेश म्हणाले की, नेताजींना जिथे प्रचार करायचा होता, तिथे त्यांनी केला. आम्ही त्यांना याबाबत काहीच सांगितलं नाही. राहुल गांधींचीही इच्छा आहे की, यूपीचा विकास व्हावा म्हणून काँग्रेससोबत आघाडी केली आहे. मी राहुल गांधींना पूर्वीपासून ओळखतो. आम्हाला यूपीमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार हवं आहे, त्यासाठीच आम्ही काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. मी कंजूष लोकांशी मैत्री करत नसल्याचंही अखिलेश यादवांनी स्पष्ट केलं आहे.