शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेशसमर्थक मंत्र्याला डच्चू

By admin | Updated: October 27, 2016 04:59 IST

आपल्याच पक्षाच्या एका विधान परिषद सदस्याला मारहाण केल्याच्या कारणास्तव, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थक असलेल्या तेजनारायण

लखनौ : आपल्याच पक्षाच्या एका विधान परिषद सदस्याला मारहाण केल्याच्या कारणास्तव, समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांनी मुख्यमंत्र्यांचे समर्थक असलेल्या तेजनारायण उर्फ पवनकुमार पांडे या मंत्र्याची पक्षातून बुधवारी हकालपट्टी केली. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतरही त्यांना अखिलेश यादव यांनी मंत्रिमंडळातून दूर केलेले नाही वा पांडे यांनी स्वत:हून राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे समाजवादी पक्षातील वाद संपण्याऐवजी अधिकच चिघळत चालल्याचे उघड झाले आहे. शिवपाल यादव यांच्यासह काढलेल्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याबाबत अखिलेशच निर्णय घेतील, असे मुलायमसिंग यांनी मंगळवारी म्हटले होते. मात्र, अखिलेशविरोधी गटातील प्रदेशाध्यक्ष शिवपाल यांच्यासह कोणीही आता पुन्हा मंत्री बनण्यास उत्सुक नाही. एवढेच नव्हे, तर शिवपाल यांनी त्यांना मंत्री म्हणून मिळालेला बंगलाही रिकामा करायला सुरुवात केली आहे. पांडे यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याची घोषणा शिवपाल यांनीच केली. पांडे यांनी विधान परिषद सदस्य आशू मलिक यांना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यातच मारहाण केल्याचा आरोप आहे.मूळचे विश्व हिंदू परिषदेचे असलेल्या आणि एकदा शिवसेनेतर्फे उत्तर प्रदेश विधानसभेते निवडून गेलेल्या पांडे यांनी काही वर्षांपूर्वी सपामध्ये प्रवेश केला. ते फैजाबादचे आमदार आहेत. बाबरी मशीद पाडण्याच्या कृतीबद्दल त्यांच्यावर खटला सुरू असून, ते दबंग नेते म्हणूनच ओळखले जातात. ते अखिलेश यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे मंत्र्याची पक्षातून हकालपट्टी करून, शिवपाल यांनी पांडे यांना नव्हे, तर अखिलेश यांनाच धक्का दिला. त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवपाल यांनी पत्राद्वारे अखिलेश यांना कळविले. तरीही अखिलेश यांनी त्यांना मंत्रिपदावरून दूर केले नव्हते वा पांडे यांनीही राजीनामा दिला नव्हता. त्या दोघांची कृती ही मुलायमसिंग व शिवपाल यांच्याविरुद्धचे बंड मानले जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)राज्यपालांना भेटले अखिलेशअखिलेश यांनी दुपारी राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतल्याने, ते पांडे यांच्या राजीनाम्याची माहिती देतील, असा अंदाज होता. पण तसे घडले नाही. राज्यातील परिस्थिती व घडामोडींची माहिती मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिली, असे राजभवनातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रीय लोकदल यांच्याशी निवडणूक समझोता करायची तयारी, मुलायमसिंग यादव आणि त्यांचे बंधू शिवपाल यादव यांनी सुरू केली आहे. त्यासाठी बोलणी सुरू असल्याचेही सांगण्यात आले.