शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अखिलेश इतका कुणीही माझा अपमान केला नाही - मुलायम सिंह

By admin | Updated: April 1, 2017 17:32 IST

जो स्वतःच्या वडिलांचा होऊ शकला नाही तो दुस-या कुणाचाही होऊ शकत नाही, अशी बोचरी टीका मुलाय सिंह यादवांनी अखिलेश यादव यांच्यावर केली आहे.

ऑनलाइन लोकमत

लखनौ, दि. 1 - उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी मुलगा अखिलेश यादव यांच्यावर बोचरी टीका केली आहे.   
 
जो आपल्या वडिलांचा होऊ शकला नाही तो दुसऱ्या कुणाचाही होऊ शकत नाही, अशा शब्दात मुलायम यांनी अखिलेश यांच्यावर हल्लाबोल केला आहे.  मेनपुरी येथील पार्टीतील कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुलायम सिंह यादव यांनी हे विधान केलं आहे. 
 
शिवाय,यापूर्वी माझा एवढा अपमान कधीही झाला नव्हता. मी अखिलेशला मुख्यमंत्री बनवलं मात्र त्यानं माझं काहीही एक ऐकलं नाही, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 
 
मुलायम सिंह यांनी भारतीय राजकारणाचं उदाहरण देत सांगितले की, कोणत्याही बापाने स्वतः राजकारणात असताना आपल्या मुलाला मुख्यमंत्री बनवल्याचे मी पाहिले नाही. अखिलेशनं काका शिवपाल सिंह यांनाही मंत्री पदावरुन हटवलं, असं सांगत त्यांनी भाऊ शिवपाल सिंह यादव यांचा झालेल्या अपमानाबाबतही यावेळी  भाष्य केलं. 
उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी अखिलेश यांनी पार्टीत तख्ता पालट करत एक विशेष राष्ट्रीय अधिवेशन बोलावलं होतं. यावेळी त्यांनी स्वतःला पक्षाचे अध्यक्ष व वडील मुलायम सिंह यादव यांना पक्षाचे संरक्षक म्हणून घोषित केलं होतं. तर काका शिवपाल सिंह यादव यांना पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर हटवलं होतं. याशिवाय अमर सिंह यांनाही बाहेर रस्ता दाखवला होता. या बदलानंतर जवळपास दोन महिन्यांपर्यंत पक्ष आणि यादव कुटुंबात दंगल सुरू होती. 
 
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यांच्याकडून मुलायम सिंह यांना बाजूला सारण्यात आल्यानं पक्षाला निवडणुकीत हार पत्करावी लागली, असे अनेक सपा नेत्यांचं म्हणणं आहे.  तर दुसरीकडे अखिलेश यांनी पक्ष प्रमुखाचा पदभार स्वीकारताना, "मला माझ्या वडिलांचा खूप आदर आहे", असे म्हटलं होते. मात्र निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवडे झाले तरी आतापर्यंत दोघांमध्ये साधा संवादही घडला नसल्याची माहिती समोर आली आहे.
 
दरम्यान, राज्यातील निवडणुकीतील पराभवाला अखिलेश जबाबदार नाही, असं मुलायम सिंह यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.  शिवाय, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी  सोहळ्यावेळी मुलायम सिंह यादव अखिलेश यांचा हात धरुन व्यासपीठावर पोहोचले होते.
 
विशेष म्हणजे, "अखिलेशची काळजी घ्या", असे मुलायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानात पुटपुटले होते, अशीही माहिती समोर आली आहे.