आजन्म कारावास रद्द
By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे आरोपीला संशयाचा लाभ देऊन आजन्म कारावासाची शिक्षा रद्द केली आहे.
आजन्म कारावास रद्द
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे आरोपीला संशयाचा लाभ देऊन आजन्म कारावासाची शिक्षा रद्द केली आहे.प्रफुल्ल ऊर्फ प्रभाकर रामाजी कोहाड (७०) असे आरोपीचे नाव असून तो दाभा, ता. बाबुळगाव (यवतमाळ) येथील रहिवासी आहे. त्याच्यावर इंदिरा नामक महिलेची हत्या केल्याचा आरोप होता. इंदिरा दूध विकण्याचा व्यवसाय करीत होती. आरोपी तिची जनावरे चारत होता. ही घटना नोव्हेंबर-२००६ मधील आहे. १७ मे २००९ रोजी वर्धा सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाने प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. आर्वी पोलिसांनी घटनेचा तपास केला होता. आरोपीतर्फे ॲड. महेश राय यांनी बाजू मांडली.