शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अजय सिंग ते योगी आदित्यनाथ, कसा आहे UPच्या मुख्यमंत्र्यांचा प्रवास

By admin | Updated: March 19, 2017 13:30 IST

उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत कमालीचे यश मिळविल्यावर 21 व्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड भाजपाकडून एकमताने करण्यात आली.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत कमालीचे यश मिळविल्यावर भारतातील सर्वात मोठ्या राज्याच्या 21 व्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची निवड भाजपाकडून एकमताने करण्यात आली आहे. आक्रमक हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून परिचित असलेले योगी आदित्यनाथ आज मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील. उत्तराखंड मधील गढवाल या भागात 5 जून1972 रोजी योगी आदित्यनाथ यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव अजय सिंह आहे. योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदार संघातून सलग पाच वेळा निवडून आले आहेत. वयाच्या 26 व्या वर्षी ते लोकसभेवर निवडून गेले होते. 1998 रोजी लोकसभेत सर्वात तरुण खासदार होते. तेव्हापासून ते 2014 पर्यंत ते निवडून आले आहेत. गढवाल विद्यापीठातून आदित्यनाथ यांनी बीएस्सीची पदवी मिळवली आहे. पदवीनंतर त्यांना संन्यास घेण्याची इच्छा झाली. नाथ संप्रदायाची दीक्षा घेऊन ते संन्यासी झाले. गुरू अवैद्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली ते साधना करत होते. तसेच राजकीय कार्यातही ते रस घेऊ लागले. हिंदू वाहिनी नावाची संस्था उभारुन त्यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा विस्तार केला. हिंदू वाहिनी म्हणजे हिंदू युवकांचा सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रवादी गट आहे.योगी आदित्यनाथ नेहमी असं काही ना काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करत असतात ज्यामुळे नेहमी चर्चेत असतात. योगी आदित्यनाथ यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा अनेकदा अडचणीत सापडली असून विरोधकांना भाजपावर टीका करण्याची संधी मिळाली आहे. योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून ज्ञात आहेत. त्यांच्या विरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगे पसरवणे, हत्येचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, चिथावणी देणे, धमकी देणे अशा अनेक प्रकरणांचा समावेश आहे.