शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

औरंगाबादहून लवकरच देशातील महानगरांमध्ये विमानसेवा; केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 09:36 IST

लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी चर्चा

नवी दिल्ली : औरंगाबाद येथील देशातील प्रमुख महानगरांमध्ये जाण्यासाठी लवकरच हवाई मार्गाने जोडले जाणार असून यामुळे मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासाला नवी संजीवनी मिळेल, असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला.लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी आज केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची  भेट घेतली. यावेळी डॉ. कराड यांनी औरंगाबाद व मराठवाडा विभागाच्या विकासासाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

यावेळी महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर असलेल्या औरंगाबाद येथून विमानसेवा योग्यरीतीने नसल्याने विकासाला चालना मिळत नाही, तसेच लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी निदर्शनास आणून दिले. याबद्दल बोलताना डॉ. कराड म्हणाले, औरंगाबाद येथून देशातील इतर महानगरांमध्ये जाण्यासाठी अडचणी येत आहेत. या अडचणींवर मात करीत आता दोन विमान कंपन्यांनी औरंगाबाद येथून महानगरांमध्ये विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उडान या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत बिग चार्टर प्रायव्हेट लिमिटेडची फ्लाय बिग व प्रसिद्ध उद्योजक राकेश झुनझुनवाला यांची आकासा एअर कंपन्यांनी औरंगाबादहून महानगरांमध्ये विमानसेवा देण्याची हमी दिली आहे. यामुळे औरंगाबादहून आता मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगलुरू, कोल्हापूर, नांदेड या शहरांमध्ये  थेट विमानसेवा सुरू केली जाणार आहे. 

औरंगाबाद येथेच बेस राहीलऔरंगाबाद येथे बेस तयार करून या महानगरांमध्ये विमानांची ये-जा केली जाणार आहे. यासाठी मुंबई व पुणे हे गर्दीचे विमानतळ आहे. या विमानतळांवर विमानांना उतरण्यासाठी वेळ देण्याच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे.  यासंदर्भात केंद्रीय नागरी उड्डयणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली आहे. शिर्डी येथे दररोज १२ पेक्षा अधिक विमाने उतरतात.  

औरंगाबादला बुद्धिस्ट हेरिटेजशी जोडावे - सुनीत कोठारीबोधगया, सारनाथ, बनारस, कुशीनगर येथे येणाऱ्या पर्यटकांना औरंगाबाद येथे येण्यासाठी बुद्धिस्ट हेरिटेजशी औरंगाबादला जोडण्याची आवश्यकता आहे. यामुळे विदेशातील पर्यटकसुद्धा औरंगाबाद येथे येतील, अशी सूचना सिव्हिल एव्हिएशन कमिटी औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनीत कोठारी यांनी केली.  ते म्हणाले, बौद्ध धर्माचे लोक असलेले अनेक पर्यटक येतात. या साखळीत औरंगाबादला जोडले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली. 

राजेंद्र दर्डा यांच्या कार्याचा उल्लेखकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी औरंगाबादच्या विमानतळाच्या विकासाला चालना दिली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे औरंगाबाद विमानतळाचा विस्तार झाल्याचा डॉ. भागवत कराड यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. या विमानतळाच्या विकासाला सध्या आळा बसला आहे. या नव्या योजनांमुळे राजेंद्र दर्डा यांनी केलेल्या या दूरदृष्टीच्या विकासाला चांगले फळ येईल, असेही विजय दर्डा यावेळी म्हणाले.

बँकिंग क्षेत्रातील दिग्गजांची औरंगाबाद येथे बैठककेंद्र सरकारच्या विविध योजनांचा फायदा लोकांना व्हावा व बँकिंग क्षेत्राचा लाभ आदिवासी व ग्रामीण भागापर्यंत नेण्यामध्ये नेमक्या काय अडचणी येत आहे, यावर चर्चा करण्यासाठी येत्या २८ फेब्रुवारीला औरंगाबाद येथे सार्वजनिक उपक्रम व खासगी क्षेत्रातील बँकेच्या मुख्य महाव्यवस्थापक व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. ही बैठक आयोजित करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी पुढाकार घेतला आहे. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे अर्थसचिव, रिझर्व्ह बँकेचे अधिकारी, नाबार्ड, सिडकोचे अधिकारी व सार्वजनिक उपक्रमातील १२ बँकांचे व खासगी क्षेत्रातील २२ बँकांचे मुख्य महाव्यवस्थापक उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवत