शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

विमानवाहू ‘विक्रांत’ची बांधणी पूर्णतेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 05:40 IST

स्वदेशी; सप्टेंबर २०२१ मध्ये नौदलाकडे सुपूर्द

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘विक्रांत’ या पहिल्या पूर्णपणे स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या बाधणीचे काम ठरल्या वेळापत्रकानुसार सुरू होत असून, ही युद्धनौका सप्टेंबर २०२१ मध्ये चाचण्यांसाठी भारतीय नौदलाकडे सुपूर्द केली जाईल, असे युद्धनौका उत्पादन व संपादन विभागाचे प्रमुख व्हाईस अ‍ॅडमिरल ए. के. सक्सेना यांनी सोमवारी सांगितले.नौदल आणि फिक्कीने ‘जहाजबांधणीच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी’ यावरील परिसंवादाची माहिती देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अ‍ॅडमिरल सक्सेना बोलत होते. ते म्हणाले की, ‘विक्रांत’ विमानवाहू युद्धनौकेची जनित्रे या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कार्यान्वित केली जातील. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये तिच्या मूलभूत चाचण्या घेण्यात येतील. त्यानंतर प्रायोगिक सागर सफरी पूर्ण करून प्रगत चाचण्यांसाठी ही युद्धनौका सप्टेंबर २०२१ मध्ये नौदलाकडे सुपूर्द केली जाईल. आणखी एका नौदल अधिकाºयाने सांगितले की, नौदलाच्या चाचण्या फेब्रुवारी २०२१ पासून सुमारे दोन वर्षे चालतील व त्यानंतर ही विमानवाहू युद्धनौका सन २०२३ च्या सुरुवातीस नौदलाच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.कशी असेल युद्धनौका?पूर्वी भारतीय नौदलात ‘विक्रांत’ नावाची परदेशातून जुनी घेतलेली पहिली विमानवाहू युद्धनौका होती. निवृत्तीनंतर ती भंगारात गेल्यानंतर त्याच नावाची स्वदेशी युद्धनौका बांधली जात आहे.वजन ४० हजार टन असेल.हे बांधणीचे काम कोचीन जहाजबांधणी आवारात सुरू आहे.नौदलात सध्या कार्यरत असलेल्या ‘विक्रमादित्य’ विमानवाहू युद्धनौकेप्रमाणे या नव्या युद्धनौकेवरही ‘शॉर्ट टेकआॅफ बट अ‍ॅरेस्टेड रिकव्हरी’ (स्टोबार) पद्धतीची विमानोड्डाण व्यवस्था असेल.तुलनेने कमी लांबीची धाव घेऊन शेवटी शेवटी जराशा उंच धावपट्टीवरून उडी घेत (स्की जंप) लढाऊ विमाने या युद्धनौकेवरून उड्डाण करू शकतील. उतरण्यासाठीही त्यांना कमी धावपट्टी लागेल.‘विक्रांत’वर रशियन बनावटीची ‘मिग २९ के’ लढाऊ विमाने असतील. ‘विक्रमादित्य’वरही तीच विमाने आहेत.