शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एअरबस, महिंद्रा लष्करासाठी बनविणार हेलिकॉप्टर

By admin | Updated: July 4, 2015 02:47 IST

एअरबस हेलिकॉप्टर्स आणि महिंद्रा डिफेन्स यांनी भागीदारी करून भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टर्स बनविण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

नवी दिल्ली : एअरबस हेलिकॉप्टर्स आणि महिंद्रा डिफेन्स यांनी भागीदारी करून भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टर्स बनविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. भारत सरकारने हाती घेतलेल्या मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत हा संयुक्त उद्यम सुरू करण्यात येणार आहे. एअरबसने जारी केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. लष्करासाठी हेलिकॉप्टर बनविणारा हा पहिलाच खाजगी भागीदारीतला उद्यम ठरणार आहे. निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही कंपन्या आता भागीदारीविषयक उद्यमाला अंतिम स्वरूप देण्यासाठी वाटाघाटी करणार आहेत. हा उद्यम भारतीय लष्करासाठी टेहळणी आणि नौदलाच्या वापरासाठीच्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणार आहे. नौदलासाठी दोन प्रकारची हेलिकॉप्टर्स कंपनी बनविणार आहे. नियमित वापराचे हेलिकॉप्टर आणि बहुउपयोगी हेलिकॉप्टर असे त्यांचे प्रकार आहेत. एअरबस हेलिकॉप्टर्सचे अध्यक्ष आणि सीईओ ग्युलायूम फॉरी यांनी म्हटले की, स्थानिक उद्योगांशी भागीदारी करून उद्योग उभारणीचा आमचा अनुभव अद्वितीय आहे. जगभरात आम्ही असे उद्योग चालवितो. भारतात आम्ही महिंद्राशी भागीदारी करीत आहोत. हा प्रकल्पही यशस्वी होईल, यात शंका नाही. या प्रकल्पाचा दोन्ही कंपन्यांनाच नव्हे, तर भारतालाही लाभ होईल. या भागीदारीतून आम्ही हेलिकॉप्टरसाठी पूर्णत: देशी बनावटीची औद्योगिक व्यवस्था निर्माण करू इच्छितो. या संयुक्त उपक्रमातून भारतीय लष्कराला भारतातच बनविलेले हेलिकॉप्टर्स पुरविले जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)महिंद्रा डिफेन्स सिस्टिम्स लिमिटेडच्या हवाई आणि संरक्षण विभागाचे अध्यक्ष एस.पी. शुक्ला यांनी सांगितले की, आम्हाला इंजिनिअरिंग आणि वाहन क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव आहे. हवाई उपकरणे बनविण्याच्या क्षेत्रात आमची गुंतवणूकही उत्तम आहे. एअरबस हेलिकॉप्टर्सकडे उच्च दर्जाचे रोटोक्राफ्ट प्लॅटफॉर्मचे तंत्रज्ञान आहे. याचा लाभ आमच्या उपक्रमाला होईल. दुसऱ्या पिढीतील हेलिकॉप्टर्स आम्ही बनवू. भारताची गरज त्यातून भागेलच, शिवाय निर्यातही करता येईल.