शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कारमध्ये पुढे बसणाऱ्यांठी आता एअरबॅग अनिवार्य?; लवकरच नियम लागू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 14:17 IST

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअर बॅग अनिवार्य करण्याचा तयार करण्यात आला प्रस्ताव

ठळक मुद्देलोकांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आला प्रस्तावरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर ड्राफ्ट नोटिफिकेशन जारीगाड्यांच्या किंमती वाढण्याची शक्यता

कारमध्ये पुढच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारनं आता कारमध्ये पुढील भागात एअरबॅग अनिवार्य करण्याचा विचार केला आहे. यासंबंधी एक प्रस्तावही सादर करण्यात आला आहे. अपघाताच्या प्रसंगी प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळवारी यासंबंधी एक ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. कारमध्ये पुढे बसणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेसाठी एअर बॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं. १ एप्रिल २०२१ पासून हा निर्णय नव्या गाड्यांसाठी लागू होण्याची शक्यता आहे. तर सध्या उपलब्ध असलेल्या गाड्यांसाठी १ जूनपासून हा नियम लागू होण्याची शक्यता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर २८ डिसेंबर रोजी हा ड्राफ्ट प्रकाशित करण्यात आला आहे. तसंच यासंबंधी काही सूचना असल्यास त्या ३० दिवसांच्या आत morth@gov.inwithin या ईमेलवर पाठवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. वाहनांची किंमत वाढणारसरकारच्या या प्रस्तावानंतर फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डिलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार जर एअर बॅग अनिवार्य करण्यात आल्या तर गाड्यांची किंमत वाढू शकते. विक्रीवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी उत्पादकांना याचा खर्च स्वत:हून करावा लागणार असल्याचंही म्हटलं आहे. "सरकारचा एअर बॅग अनिवार्य करण्याचा प्रस्ताव हा अतिशय योग्य आहे. हे सुरक्षेच्या दृष्टीनं योग्य असून ते जागतिक दर्जानुसार बनवले गेले पाहिजेत," असंही मत FADA चे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितलं. 

टॅग्स :carकारroad safetyरस्ते सुरक्षाpassengerप्रवासीNitin Gadkariनितीन गडकरी