शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवास २५ टक्क्यांनी स्वस्त होणार? शुल्क माफी प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येणार

By मनोज गडनीस | Updated: April 10, 2026 13:48 IST

मुंबईसह देशातील प्रमुख ३४ विमानतळांवर ही शुल्क कपात करण्यात येणार

मनोज गडनीस, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इराण-अमेरिका युद्धामुळे इंधन शुल्कात झालेल्या मोठ्या वाढीनंतर विमान प्रवास महागल्याच्या मुद्यावर विमान कंपन्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आता देशभरातील विमानतळांवरील पार्किंग व लँडिंग शुल्कात २५ टक्क्यांनी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शुल्क माफी प्रवाशांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, यामुळे देशांतर्गत विमान तिकिटे २५ टक्क्यांनी कमी होण्याचे संकेत आहेत.

मुंबईसह देशातील प्रमुख ३४ विमानतळांवर ही शुल्क कपात करण्यात येणार असून, आगामी तीन महिन्यांकरिता ती कायम राहणार आहे. केंद्र सरकारने याची अंमलबजावणी करण्याचे आदेश एअरपोर्टस् इकोनॉमिक रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाला दिले आहेत. हेच आदेश भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या विमानतळांनाही लागू राहणार आहेत. 

विमान इंधनाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर तसेच पश्चिम आशियातील विमान सेवा विस्कळीत झाल्यामुळे विमान कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर तोटा सहन करावा लागत आहे. याचा फटका केवळ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमान प्रवास महाग झाल्याचा मुद्दा नसून देशांतर्गत मार्गांवरील किमतीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. 

...कशी होते दर आकारणी?

विमानाचे वजन आणि आकारमान यानुसार लँडिगचे शुल्क आकारले जाते. सरासरी विचार करता किमान देशांतर्गत मार्गावर ५,२५० रुपये ते ८ हजार रुपयांपर्यंत ही शुल्क आकारणी होते. तर, आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी किमान २० हजार रुपयांची शुल्क आकारणी होते.विमानाच्या वजनानुसार आणि वेळेनुसार प्रति तासाप्रमाणे पार्किंग शुल्क आकारले जाते.

२५% विमानतळावरील पार्किंग व लँडिंग शुल्कात झालेली घट

आगामी काळात उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सरकारने कमी केलेल्या पार्किंग व लँडिंग शुल्काचा फायदा ग्राहकांना देण्यात येणार आहे, असे संकेत विमान कंपन्यांतील सुत्रांनी दिले. दरम्यान, पार्किंग व लँडिंग शुल्कात २५ टक्क्यांची कपात केल्यानंतर या प्रमुख विमानतळांवरून ४०० कोटी रुपयांची महसूल तूट होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Flight fares likely to fall by 25% as airport fees cut.

Web Summary : Central government cuts airport parking and landing fees by 25% to ease burden on airlines. Passengers likely to benefit from lower ticket prices. The order applies to 34 major airports for three months, potentially reducing airline revenue by ₹400 crore.
टॅग्स :airplaneविमान