शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियात गोंधळ घातला तर आता 15 लाख दंड !

By admin | Updated: April 17, 2017 19:18 IST

गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी एअर इंडिया नवा नियम बनवण्याचा विचार करत आहे. गोंधळ घालणा-या प्रवाशामुळे जर विमानाला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 17 - गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी एअर इंडिया नवा नियम बनवण्याचा विचार करत आहे.  गोंधळ घालणा-या प्रवाशामुळे जर विमानाला 1 तास उशीर झाला तर 5 लाख रूपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. तर 2 तासापेक्षा जास्त उशीर झाल्यास 15 लाखाचा दंड आकारण्याची तयारी एअर इंडिया करत आहे.
 
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार,  गेल्या महिन्यात एअरइंडियाच्या एका कर्मचा-यासोबत शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीनंतर एअर इंडिया गोंधळ घालणा-या प्रवाशांसाठी नियम बनवण्याचा विचार करत आहे. लवकरच हा नियम लागू होऊ शकतो. या नियमानुसार गोंधळ घालणा-या प्रवाशाची लगेच पोलिसात तक्रार केली जाणार आहे.
 
याशिवाय विमानाला 1 तास उशीर झाल्यास 5 लाख आणि 2 तास उशीर झाल्यास 15 लाखांचा दंड आकारण्याचा नियम एअर इंडिया आणणार आहे. पण जर कोणत्याही चुकीशिवाय म्हणजे एअर इंडियामुळेच जर विमानाला उशीर झाला तर कोणत्याही दंडाची तरतूद नाही. एअर इंडियाशिवाय अन्य विमान कंपन्याही असा नियम बनववणार असल्याचं वृत्त आहे.
 
यापूर्वी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आणि पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांच्या विमानप्रवासामुळे वादंग निर्माण झाला होता. त्यांच्यामुळे एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. रवींद्र गायकवाड यांच्या विमानप्रवासावरही बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लेखी आदेशानुसार शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी हटवण्यात आली होती.