शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

२२ हायवे बनणार हवाई दलाचे इमर्जन्सी रन वे

By admin | Updated: October 18, 2016 04:50 IST

उत्तरप्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या ४ राज्यांतील २२ महामार्ग (हाय वे) विमानळाच्या रन वे सारखे विकसित करण्याच्या योजनेवर कार्यवाही

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- युध्दकाळात लढाऊ विमानांच्या लँडिंग व टेक आॅफ साठी हायवेंचा वापर करता यावा, या हेतूने उत्तरप्रदेश, राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या ४ राज्यांतील २२ महामार्ग (हाय वे) विमानळाच्या रन वे सारखे विकसित करण्याच्या योजनेवर कार्यवाही सुरू झाली आहे. केंद्रीय संरक्षण व भूतल परिवहन मंत्रालय या प्रकल्पावर संयुक्तपणे काम करीत आहेत. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे भारतातल्या दुर्गम व अवघड भागातही हवाई वाहतुकीचे नेटवर्क सुरू होऊ शकेल, अशी माहिती भूतल परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.त्यासाठी संरक्षण व भूतल परिवहन मंत्रालयाची त्यासाठी संयुक्त समिती नियुक्त करण्यात आली आहे. ज्या राज्यात हे प्रस्तावित २२ हाय वे आहेत, त्यांचा गरजेच्या वेळी हवाई दलाला रन वे सारखा वापर करता आला पाहिजे, यासाठी स्टँडर्ड आॅपरेटिंग प्रक्रिया तयार करावी लागणार आहे. भूतल परिवहन मंत्रालयाने संबंधित राज्यांना त्यासाठी मार्गदर्शन करावे, असे हवाई दलाने सुचवले आहे.बांगला देश मुक्ती संग्रामाच्या काळात पाकची काही विमाने आग्य्रापर्यंत आली होती. या लढाऊ विमानांना भारतात बॉम्बचा वर्षाव करता आला नाही कारण भारतीय हवाई दलाने त्याआधीच त्यांना परतवून लावले. तेव्हापासून आपल्या लढाऊ विमानांच्या इमर्जन्सी टेक आॅफ व लँडिंग साठी देशांतर्गत व्यवस्था असली पाहिजे, हा विचार सुरू झाला. भारतात २१ मे २0१५ रोजी दिल्ली-आग्रा यमुना एक्सप्रेस वे वर मिराज २000 च्या लँडिंगचा सफल प्रयोग हवाईदलाने केला. >पाकमध्येही असे रन वेपाकिस्तानात इस्लामाबाद ते पेशावर व लाहोर ते इस्लामाबाद हे दोन महामार्ग असे आहेत की, ज्याच्या ४ धावपट्ट्यांचा रन वे सारखा वापर होऊ शकतो. पाकिस्तानने २000 साली या महामार्गांवर लढाऊ विमानांच्या लँडिंगची चाचणीही घेतली होती. उरी येथील तळावर हल्ला झाल्यानंतर, उभयपक्षी तणावात प्रचंड वाढ झाली होती. पाकिस्तानने यावेळी इस्लामाबादजवळील हायवे चा रनवे सारखा वापर केल्याची माहिती पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांनी व्टीटरवर काही छायाचित्रे पोस्ट करून दिली होती.