शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आरोपांची ‘हवाबाजी’ !

By admin | Updated: September 11, 2015 05:37 IST

काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका अवलंबल्यामुळे ‘हवालाबाज’ हतोत्साहित झाले असून त्यांनी सरकारच्या सुधारणात्मक कार्यक्रमात अडथळे आणण्याचे काम चालविले

भोपाळ : काळ्या पैशाबाबत केंद्र सरकारने कठोर भूमिका अवलंबल्यामुळे ‘हवालाबाज’ हतोत्साहित झाले असून त्यांनी सरकारच्या सुधारणात्मक कार्यक्रमात अडथळे आणण्याचे काम चालविले आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केलेल्या ‘हवाबाजी’च्या टीकेला प्रत्युत्तर दिले.जीएसटी पारित होऊ न दिल्याचा उल्लेख करीत मोदींनी काँग्रेसवर थेट हल्ला चढविला. देशाचा विकास, जनतेचे कल्याण आणि लोकशाहीच्या मार्गात हवालाबाजांनी अडचणी आणल्या आहेत. काळ््या पैशासंबंधी कठोर कायद्यामुळे ते त्रस्त झाले आहेत. सोनिया गांधी यांनी मंगळवारी काँग्रेस कार्यकारिणीला संबोधित करताना मोदींनी निवडणूक प्रचाराच्यावेळी दिलेली आश्वासने केवळ ‘हवाबाजी’ ठरली, असे टीकास्त्र सोडले होते. त्यावर मोदी भोपाळ येथे भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले की, हवालाबाज (घोटाळेबाज) आमच्याकडे उत्तर मागत आहे. आमच्या सरकारने अनेक योजनांमधील पळवाटा रोखत देशाचा खजिना समृद्ध केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून काँग्रेसला अद्यापही सावरता आलेले नाही. त्यामुळेच या पक्षाने खोळंबा करण्याचे तंत्र अवलंबले आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन पूर्णपणे वाया गेले. जीएसटी विधेयक लांबणीवर पडण्यासाठी हा पक्षच जबाबदार आहे. अन्य पक्षांना सभागृह चालावे, कामकाज व्हावे असे वाटत होते. केवळ काँग्रेसला ते मान्य नव्हते. मग्रुरीतून आलेल्या संघर्षाच्या वृत्तीला लोकशाहीत स्थान आहे काय? जनतेने ज्यांना नाकारले, पराभूत केले अशा पक्षांना मी संसदेचे कामकाज चालू द्यावे असे आवाहन जाहीररीत्या केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) या प्रकरणी मोदी गप्प का?विदेशमंत्री सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरील आरोपांबाबत मोदी एक शब्दही बोलले नाहीत. ते आता गप्प का? असा सवाल काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या. आमच्या सरकारने हवालाबाजांच्या नाड्या आवळल्या आहेत, असे मोदींनी म्हटले होते. सोनिया गांधी दोन दिवसांच्या रायबरेली दौऱ्यावर असून त्यांनी येथे स्थानिक नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली. मोदींच्या विधानाबद्दल त्यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली होती.हवाबाज, दगाबाज हे जनतेने दिलेले संबोधननिवडणुकीपूर्वी आश्वासनांचा पाऊस पाडणारे लोक सत्तेवर आल्यानंतर सर्व काही विसरल्यामुळे देशातील जनता त्यांना हवाबाज आणि दगाबाज असे संबोधत आहे, असे काँग्रेसचे प्रसिद्धीप्रमुख रणदीपसिंग सूरजेवाला यांनी दिल्लीत म्हटले आहे.