शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पैसे देऊन महिलांना दगडफेकीसाठी तयार करते आसिया, NIAनं केलं FIR दाखल

By admin | Updated: June 7, 2017 07:33 IST

काश्मीरमधील दगडफेक करणा-या तरुणांना फुटीरतावादी नेत्यांकडून पैसे पुरवले जात असल्याचं समोर आलं होतं.

ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 7 - गेल्या काही दिवसांपूर्वी काश्मीरमधील दगडफेक करणा-या तरुणांना फुटीरतावादी नेत्यांकडून पैसे पुरवले जात असल्याचं समोर आलं होतं. याच प्रकरणात NIAनं एफआयआर दाखल केलं आहे. FIRमध्ये हाफिज सईदसोबत महिला फुटीरतावादी नेत्या आसिया अंद्राबी हिचेसुद्धा नाव आहे. आसिया पैसे देऊन महिलांना दगडफेकीसाठी तयार करत असल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणे(NIA)नं काश्मीर सतत धुमसतं ठेवणा-या हुर्रियत नेत्यांच्या निधीच्या प्रकरणात FIR दाखल केलं आहे. हुर्रियत नेत्यांना हाफिज सईद आणि इतर पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून काश्मीरमध्ये हिंसा पसरवणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे आणि सुरक्षा जवानांवर दगडफेक आणि स्कूल, सरकारी इमारतीचं नुकसान करण्यासाठी निधी दिला जातो, हे काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं.  
तत्पूर्वी दुख्तरान-ए-मिल्लत या फुटीरतावादी संघटनेची प्रमुख आसिया अंद्राबी हिला जम्मू काश्मीर पोलिसांनी अटकही केली होती. काश्मीर खो-यातील महिलांना सुरक्षा दलातील जवानांवर दगडफेक करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि येथील जनजीवन विस्कळीत करण्याच्या आरोपाखाली आसियाविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली होती. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अशांतता पसरवण्याच्या आरोपाखाली आसियाला अटक करण्यात आले होते. एवढेच नाही तर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी झेंडा फडकावल्याबद्दल आसिया विरोधात बेकायदा कृत्ये नियंत्रण कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तिला ताब्यात घेण्यात आले होते.  2015मध्ये आसियानं आपल्या जम्मू येथील निवासस्थानी 14 ऑगस्ट रोजी पाकिस्ताच्या स्वातंत्र्य दिन साजरा करत आपल्या समर्थकांसह पाकिस्तानी झेंडे फडकावले होते.