शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

यूपीएससी परीक्षेवर ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच; ‘नीट’सारखा गोंधळ टाळण्यासाठी उपाययोजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2024 05:46 IST

नीट-यूजी, नेट आदी महत्त्वाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची प्रकरणे उजेडात आल्याने गदारोळ माजला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नीट-यूजी, नेट आदी महत्त्वाच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याची प्रकरणे उजेडात आल्याने गदारोळ माजला आहे. असा गोंधळ यूपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये होऊ नये म्हणून त्या संस्थेने तातडीने काही पावले उचलली आहेत. त्या परीक्षांमध्ये कोणतेही गैरप्रकार होऊ नयेत यासाठी परीक्षार्थींची ओळख पटविण्याकरिता फेशियल रेकग्निशन तंत्र तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे संचालित होणारे सीसीटीव्ही यांचा वापर करण्याचे यूपीएससीने ठरविले आहे. 

आधारवर आधारित फिंगरप्रिंट ऑथेन्टिकेशन व फेशियल रेकग्निशन तसेच प्रवेशपत्रांचे क्यू-आर कोड स्कॅनिंग या कामासाठी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून उपकरणे मागविण्यासाठी यूपीएससीने नुकतीच निविदा सूचना जाहीर केली आहे. यूपीएससी भारतीय प्रशासनिक सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) यांच्यासह १४ महत्त्वाच्या परीक्षा घेते.

दर २४ परीक्षार्थींमागे एक सीसीटीव्हीयूपीएससीने म्हटले आहे की, स्पर्धा परीक्षा घेण्यात येणाऱ्या केंद्रातील प्रत्येक वर्गामध्ये पुरेशा प्रमाणात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. दर २४ परीक्षार्थींमागे एक सीसीटीव्ही असे हे प्रमाण असेल.तसेच परीक्षा केंद्राचे प्रवेशद्वार तसेच तिथून बाहेर जाण्याचा मार्ग, नियंत्रण कक्ष या ठिकाणीही सीसीटीव्ही बसविणे आवश्यक आहे. प्रत्येक वर्गात एकतरी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे आवश्यक आहे.परीक्षा केंद्रावर कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्या तर त्याबद्दल त्वरित इशारा देणारी आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित व्हिडीओ यंत्रणा परीक्षा केंद्रांत बसविण्याचा यूपीएससीचा विचार आहे.

यंदा २६ लाख उमेदवार बसणार परीक्षेला- यूपीएससीतर्फे होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी यंदा २६ लाख परीक्षार्थी असण्याची शक्यता आहे. त्यासाठी लेह,  कारगिल, श्रीनगर, इम्फाळ, आगरतळा, गंगटोक आदींसह ८० ठिकाणी परीक्षा केंद्रे असण्याची शक्यता आहे. - स्पर्धा परीक्षा मुक्त तसेच निष्पक्षपाती वातावरणात पार पडाव्यात यासाठी अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, असे यूपीएससीने म्हटले आहे. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग