मुंबईच्या आयआयटीयनला फेसबुककडून मिळाले आतार्पयतचे सर्वात मोठे पॅकेज
जयपूर : मुंबईच्या आयआयटीत शिकणा:या आस्था अग्रवालला फेसबुकने सालिना 2 कोटी 10 लाखांचे सॅलरी पॅकेज देऊ केले आहे. फेसबुकने दिलेली ही आतार्पयतची सर्वात मोठी ऑफर आहे.
आस्थाचे शालेय शिक्षण जयपूरच्या सेंट ङोविअर्समध्ये झाले. तिला 12वीला 98 टक्के गुण मिळाले होते. जेईईमध्ये 9क्वा क्रमांक मिळाल्यानंतर तिने मुंबई आयआयटीतील कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रमाची निवड केली. तिचे वडील राजस्थानच्या विद्युत निगमचे कार्यकारी अभियंता आहेत.
इतक्या मोठय़ा पॅकेजची ऑफर मिळेल, अशी अजिबात अपेक्षा नव्हती. माङया यशात शाळेतील शिक्षकांचे योगदान मोठे आहे.
- आस्था अग्रवाल
अवघ्या पाच वर्षापूर्वी फेसबुक अकाउंट उघडणा:या आस्थाला याच सोशल नेटवर्किग कंपनीकडून इतक्या लठ्ठ पगाराची ऑफर आली.