शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आगोद सरपंचांवर प्रश्नांचा भडीमार

By admin | Updated: August 3, 2015 00:13 IST

ग्रामसभेत खडाजंगी : पाणी टंचाईवर तोडगा क ाढण्याची मागणी

ग्रामसभेत खडाजंगी : पाणी टंचाईवर तोडगा क ाढण्याची मागणी
काणकोण : काणकोण तालुक्यातील आगोंद पंचायतीची ग्रामसभा रविवारी प्रश्नोत्तरांनी बरीच गाजली. सरपंच नवनिता नाईक गावकर यांच्यावर ग्रामस्थांनी आगोंद पंचायतीच्या विकासकामावरून प्रश्नांचा भडिमार करून नाकीनऊ आणले.
याबाबत सरपंच नाईक गावकर म्हणाल्या, पंचायत क्षेत्रातील विकासकामे करण्याचा प्रस्ताव होऊन क्रीडामंत्र्याची भेट घेतली. तेव्हा मंत्र्यांनी खोला मतदारसंघात जिल्हा पंचायत उमेदवाराचा पराजय झाल्याचे सांगून आगोंद पंचायत क्षेत्रातील विकासकामे करण्याबाबत उदासीनता दर्शविली.
क्रीडामंत्र्यांनी जर असे सांगितले तर आपण यासंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया का दिली नाही, असे ग्रामस्थांनी विचारल्यावर सरपंच निरुत्तरीत झाल्या. याबाबत एकदा पंचायत मंडळाच्या बैठकीत सरपंचांना विचारले असता तेव्हाही सरपंचांनी काही सांगीतले नसल्याचे एका पंच सदस्याने सांगितले.
याबाबत क्रीडामंत्र्यांशी संपर्क साधला असता अशाप्रकारच्या विकासकामांचा असा कोणताही प्रस्ताव आपल्याकडे आला नसून आपण उदासिनता दाखविण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले. या शिवाय आपण आगोंद पंचायत क्षेत्रात बरीच विकासकामे केल्याचेही त्यांनी सांगितले. त्यातच यापुढे अंदाजे 3 कोटी रुपये कामाच्या निविदा निघाल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स
पाणी प्रश्नावरून ग्रामस्थांनी खडसावले
या ग्रामसभेत पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थांनी सरपंचांना बरेच खडसावले व मे महिन्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नाबाबत आताच उपाययोजना आखण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे श्ॉक्स प्रश्नावरूनही बरीच खडाजंगी झाली. गेल्या हंगामात घालण्यात आलेली पर्यटन कुटीरे अजूनही तशीच आहेत. ती हटवली नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तसेच कुटिरे त्वरित हटवण्याची मागणी केली. त्या शिवाय पर्यटन हंगामात पर्यटन खात्याकडून परवानगी घेऊन घालण्यात येणार्‍या श्ॉक्सवर पंचायतीतर्फे कर बसविण्याची मागणी केली. यामुळे पंचायतीच्या उत्पन्नात भर पडेल, असेही ग्रामस्थांतर्फे सांगण्यात आले. चर्चेत सदानंद देसाई, माकरुस फर्नांडिस, नारायण देसाई, गोडविन फर्नांडिस, प्रमोद फळदेसाई, विनोद फळदेसाई यांनी भाग घेतला. (लो. प्र.)