शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

अदानी समूहाच्या इशा-यानंतर EPW च्या संपादकांचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 11:02 IST

उद्योग समूहाकडून त्या पत्रकाराविरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचे प्रकार कॉर्पोरेट इंडियामध्ये वाढले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 19 - अदानी उद्योग समूहाकडून कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आल्यामुळे इकोनोमिक अँड पॉलिटिकल वीकली ईपीडब्ल्यूचे संपादक परंजय गुहा ठाकूर्ता यांना संपादकपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. उद्योग समूहाच्या धोरणांवर टीका करणारे लेख लिहील्यानंतर संबंधित उद्योग समूहाकडून त्या पत्रकाराविरोधात  बदनामीचा खटला दाखल करण्याचे प्रकार कॉर्पोरेट इंडियामध्ये वाढले आहेत. 
 
ईपीडब्ल्यू साप्ताहिक चालवणा-या ट्रस्टच्या संचालकांनी ठाकूर्ता यांना अदानी समूहावर लिहीलेले दोन लेख मागे घेण्यास सांगितले होते. मागच्या महिन्यात अदानी समूहाने आपल्या वकिलाकरवी ईपीडब्ल्यूला एक पत्र पाठवले. या पत्रामध्ये अदानी समूहाबद्दल लिहीलेले दोन लेख तात्काळ  मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. अदानी समूहाने 1 हजार कोटींची कर चुकवेगिरी केली ? आणि मोदी सरकारकडून अदानी समूहाला 500 कोटींचा लाभ असे जानेवारी महिन्यात दोन लेख छापण्यात आले होते. 
आणखी वाचा 
29000 कोटींचा कोळसा घोटाळा, अदानी समूहाची चौकशी
अदानी समूहाची आता सीबीए सल्लागार नाही
RJ मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या अळ्या, मुंबई मनपानं बजावली नोटीस
 
हे दोन्ही लेख समूहाची बदनामी करणारे असल्याने ते तात्काळ मागे घ्यावे असे पत्रात म्हटले होते. लेख मागे घेतले नाहीत तर, कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. मंगळवारी दिल्लीमध्ये समीक्षा ट्रस्टची बैठक झाली. या बैठकीत संपादकीय विभागाला दोन्ही लेख काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीनंतर परंजय गुहा ठाकूर्ता यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आपल्याला दिल्लीमध्ये कुटुंबासोबत जास्त वेळ घालवायचा आहे असे ठाकूर्ता यांनी सांगितले. 
 
समीक्षा ट्रस्टचे प्रमुख दीपक नय्यर आणि अन्य संचालकांडून या घडामोडींबद्दल कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. 20 जुलैला यासंबंधी ट्रस्टकडून बाजू मांडली जाऊ शकते. 1949 साली इकोनॉमिक विकलीची स्थापना झाली. 1966 साली साप्ताहिकाचे ईपीडब्ल्यू असे नामकरण झाले. बिझनेस जर्नलिस्ट आणि राजकीय समीक्षक राहिलेल्या  परंजय गुहा ठाकूर्ता यांनी जानेवारी 2017 मध्ये सी. राममनोहर रेड्डी यांच्याकडून संपादकपदाची सूत्रे स्वीकारील होती.   ठाकूर्ता यांना जे दोन लेख काढून टाकण्यास सांगण्यात आले होते ते दोन्ही लेख द वायरच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांनाही हे लेख काढून टाकण्यास सांगणार आहोत असे अदानी समूहाच्या वकिलाने स्पष्ट केले.