शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारानंतर पीडितेची मदतीसाठी धावाधाव, मृत मुलीला हातात घेऊन मेट्रो प्रवास

By admin | Updated: June 7, 2017 08:44 IST

नेहमी हजारोंच्या संख्येने मेट्रो प्रवास करणा-यांमध्ये 30 मे रोजी एक तरुणीदेखील आपल्या आठ वर्षाच्या मृत बाळासोबत प्रवास करत होती

ऑनलाइन लोकमत
गुरुग्राम, दि. 7 - नेहमी हजारोंच्या संख्येने मेट्रो प्रवास करणा-यांमध्ये 30 मे रोजी एक तरुणीदेखील आपल्या आठ वर्षाच्या मृत बाळासोबत प्रवास करत होती. काही वेळापुर्वीच तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. शेअर ऑटोत प्रवास करत असताना ड्रायव्हर आणि दोन प्रवाशांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला. बलात्कार करत असताना तिच्या आठ महिन्याच्या बाळाला त्या नराधमांनी रिक्षातून फेकून दिलं होतं. ज्यामध्ये त्या बाळाचा मृत्यू झाला. आपल्या मृत बाळाला घेऊन पीडितेने खूप धावाधाव केली, पण अखेर ते बाळ जगू शकले नाही. 
 
बलात्कारानंतर रात्री 2 वाजता जेव्हा नराधमांनी पळ काढला तेव्हा पीडित तरुणी काहीच हालचाल न करणा-या आपल्या बाळाला हातात घेऊन मदतीसाठी रस्त्यावर धावत होती. शेवटी एका रिक्षातून तिने आपलं सासर गाठलं. डॉक्टरांकडे गेली असता बाळाचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं. 
 
डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केल्यानंतरही तिचा विश्वास बसत नव्हता म्हणून तिने आपल्या सासू - सास-यांसोबत दिल्लीतील तुघलकाबादमधील आपल्या आई - वडिलांचं घर गाठलं. तिथून त्यांनी मेट्रोने प्रवास केला आणि डॉक्टरकडे गेले. मात्र त्या डॉक्टरांनीही बाळ मृत झाल्याचंच सांगितलं. हातात आपल्या बाळाचा मृतदेह घेऊन ती गुरुग्रामला पोहोचली. तिचा पती आणि पोलीस एम जी रोड स्टेशनला तिची वाट पाहत उभे होते. यानंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार केली. 
 
बलात्कारातून वाचलेल्या या धाडसी पीडितेने मानेसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून ती फक्त 19 वर्षांची आहे. 
 
नेमकं काय झालं होतं - 
शेजाऱ्यांशी भांडण झाल्यामुळे आपल्या ८ महिन्यांच्या मुलीला पीडित तरुणी आपल्या सासू - सास-यांकडे चालली होती. यावेळी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली. इतकंच नाही तर बलात्का-यांनी तिच्या आठ महिन्याच्या मुलीला खेचून चालत्या रिक्षेतून बाहेर फेकून दिलं. त्यावेळी फुटपाथवर डोक आपटलं गेल्यानं त्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. ​नंतर त्या नराधमांनी एका सामसूम जागी रिक्षा थांबवून महिलेवर सामूहिक बलात्कार करून ते पळून गेल्याचं समोर आलं . 
 
 
पीडित तरुणी आपल्या पतीसोबत बासकुसला गावात राहणारी होती. 29 मे रोजी रात्रीच्या सुमारात तिच्या पतीचं शेजाऱ्यांशी जोरदार भांडण झालं. त्यानंतर नाइट शिफ्ट असल्याने तो कामावर निघून गेला. पीडित तरुणीचा पती कामावर गेल्याचं पाहून शेजाऱ्यांनी पुन्हा महिलेशी भांडण सुरू केलं. भांडणाला कंटाळून तरुणी आपल्या आठ महिन्यांच्या मुलीला घेऊन सासू सा-यांकडे जाण्यासाठी निघाली होती. ती आयएमटी चौकात पोहचली. पण रात्री रस्त्यावर कोणतंही वाहन न दिसल्याने तिने एका ट्रकवाल्याकडून लिफ्ट मागितली. ट्रकमध्ये बसल्यावर चालकाने छेडछाड सुरू केली. शेवटी ती पुढे खेडकीदौला टोलनाका येताच उतरून गेली. टोलनाक्यावरून तिने एक रिक्षा पकडली होती. त्या रिक्षेत आधीच तीन तरुण बसले होते. तरीही लवकर पोहोचता यावं म्हणून ती त्या रिक्षेत बसली. मुलीला मांडीवर घेऊन रिक्षेमध्ये बसताच त्या तीन तरुणांनी छेड काढायला सुरुवात केली. तिने आरडाओरडा सुरू करताच तिची मुलगीही घाबरून रडायला लागली. त्याबरोबर त्या तरुणांनी मुलीला खेचून घेत चालत्या रिक्षेतून फेकून दिलं. त्यानंतर एका अज्ञात जागी रिक्षा थांबवून सामूहिक बलात्कार करून ते पळून गेल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तशाच अवस्थेत पीडित तरुणी घरी पोहचली.  याप्रकरणी पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
 
 दरम्यान, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात मुलीच्या खुनाचा गुन्हा नोंदविला.  पण हे सगळं सुरू असताना त्या तरुणीने तिच्यावर बलात्कार झाला असल्याचं सांगितलंसुद्धा नाही. दोन दिवसांनी तिने  याविषयी आपल्या पतीला सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.