शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

कुलूपनाट्यानंतर आप सरकार नमले

By admin | Updated: July 24, 2015 01:04 IST

दिल्ली महिला आयोगाच्या कार्यालयाला (डीसीडब्ल्यू) कुलूप ठोकण्यात आल्याचा आणि नवनियुक्त अध्यक्ष स्वाती मालीवाल यांचा नामफलक हटविण्यात

नवी दिल्ली : दिल्ली महिला आयोगाच्या कार्यालयाला (डीसीडब्ल्यू) कुलूप ठोकण्यात आल्याचा आणि नवनियुक्त अध्यक्ष स्वाती मालीवाल यांचा नामफलक हटविण्यात आल्याचा वाद गुरुवारी सकाळी ब्रेकिंग न्यूज बनल्यानंतरच्या नाट्यानंतर आप सरकारने ३० वर्षीय मालीवाल यांच्या नियुक्तीची फाईल नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या मंजुरीसाठी पाठवत नमते घेतले.आयोग कमकुवत केला जाण्याचा कट रोखण्यासाठी आम्ही मालीवाल यांच्या नियुक्तीसंबंधी फाईल नायब राज्यपालांच्या कार्यालयाकडे सादर केली आहे, असे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी जंग यांची भेट घेतल्यानंतर नमूद केले. मालीवाल यांची नेमप्लेट काढण्यात आली; मात्र हा मुद्दा आहे असे आम्हाला वाटत नाही, असेही ते म्हणाले.मालीवाल यांची नियुक्ती निष्प्रभ ठरते, कारण त्यासाठी कायदेशीर मंजुरी मिळविण्यात आलेली नसून हे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन आहे, असे जंग यांनी मंगळवारी स्पष्ट केल्यानंतर वादाची ठिणगी उडाली होती. दरम्यान, सकाळी कार्यालयाच्या दाराला कुलूप लावलेले आढळल्याचा दावा मालीवाल यांनी केला, मात्र काही तासांतच ते उघडलेले दिसले. मालीवाल यांचा नामफलक हटविण्यात आल्याने टीव्ही वाहिन्यांना ब्रेकिंग न्यूज मिळाली.माझ्या कार्यालयाला कुलूप का लावण्यात आले आणि नामफलक का हटविण्यात आला, असा सवाल मालीवाल यांनी केला. त्याचवेळी महिलांसाठी कार्यरत राहणार असल्याचा व आयोगाला जगातील सर्वात बळकट संस्था बनवणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला. सकाळी वाद गाजल्यानंतर काही वेळातच मालीवाल यांचे ‘विकास सदन’ येथील कार्यालय उघडे आढळून आले; मात्र नामफलक गायबच होता. मालीवाल यांच्या दाव्याशी विसंगत असे हे दृश्य असल्याकडे लक्ष वेधण्यात आले असता त्यांनी सकाळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कुलूप आढळून आल्याचा दावा केला. प्रसिद्धी माध्यमांचा दबाव किंवा अन्य काही कारणांमुळे ते उघडले गेले असावे. सकाळी ते लावलेलेच होते. आयोग बंद असल्यामुळे तुम्हाला कोणत्याही फायलींवर स्वाक्षरी करता येणार नाही, असे सांगण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. मालीवाल यांच्या कार्यालयातील सर्व फाईल्स नेण्यात आल्याचा दावाही करण्यात आला. (वृत्तसंस्था)