शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जाट आरक्षण आंदोलनानंतर पोलीस उपायुक्तांची शुट अॅट साईटची ऑर्डर

By admin | Updated: February 20, 2016 20:38 IST

जाट आरक्षण आंदोलनावरुन चिघळलेलं वातावरण अजून चिघळत चाललं आहे. हरियाणामधील हिस्सार आणि हंसी येथे पोलिसांनी शुट अॅट साईडटची ऑर्डर दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
 
चंदिगड, दि. 20 - जाट आरक्षण आंदोलनावरुन चिघळलेलं वातावरण अजून चिघळत चाललं आहे. हरियाणामधील हिस्सार आणि हंसी येथे पोलिसांनी शुट अॅट साईडटची ऑर्डर दिली आहे. कर्फ्यू लावलेला असतानादेखील अनेक ठिकाणी हिंसा झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी जिंद जिल्ह्यातील रेल्वे कार्यालय जाळलं तर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही रोखून धरली होती. पोलिसांसोबत खाजगी वाहनांचीदेखील तोडफोड करण्यात आली आहे. कार्यालय तसंच हंसी येथील टोलनाक्याची जाळपोळदेखील केली आहे.  पोलिसांनी आंदोलनकर्त्यांविरोधात 129 गुन्हे दाखल केले आहेत. कॅबिनेट सचिव पी के सिन्हा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कायदा - सुव्यवस्थेची माहिती घेतली. 
 
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराने शनिवारी कर्फ्यू लागू करण्यात आलेल्या ठिकाणी फ्लॅग मार्चदेखील काढला होता. रोहतकला जाणारे सर्व मार्ग बंद असल्याने लष्कराला हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. आंदोलनकर्त्यांनी दिल्ली, हिसार, रोहतक आणि फाजीलका हायवे पुर्णपणे बंद केले आहेत. हरियाणामधील 9 जिल्ह्यांत लष्कराच्या 33 तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. 
 
 
ज्या ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे त्या ठिकाणी फ्लॅग मार्च सुरु आहेत, परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल असा विश्वास डीजीपी य़शपाल सिंघल यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी पुन्हा नव्याने लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. 
 
दिल्लीत भासू शकतो आवश्यक वस्तूंचा तुटवडा -
 
जाट आंदोलकांनी राष्ट्रीय महामार्ग ब्लॉक केले असल्यामुळे याचा फटका राजधानी दिल्लीलादेखील मोठ्या प्रमाणात पडत आहे. आंदोलन जर असेच सुरु राहिले तर दिल्लीला आवश्यक गोष्टींचा तुटवडा भासू शकतो, ज्यामुळे फळ, भाज्यांच्या किंमती येणा-या दिवसांत वाढू शकतात. दिल्लीला फळ, भाज्या तसंच महत्वाच्या गरजू गोष्टींची आय़ात करण्यासाठी ज्या राष्ट्रीय महामार्गांचा वापर केला जातो ते सर्व हरियाणातूनच येत असल्याने दिल्लीला याचा मोठा फटका बसू शकतो
 
 
आंदोलनात 5 जणांचा मृत्यू - 
 
आंदोलनात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. रोहतक आणि झज्जरमध्ये सुरक्षा जवानांनी केलेल्या फायरिंगमध्ये शनिवारी 4 जणांचा मृत्यू झाला आहे. आंदोलनाच मुख्य केंद्र असलेल्या हरियाणामधून हे आंदोलन इतर जिल्ह्यांमध्ये पसरत आहे. हरियाणामधील अजून 5 जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. ज्यामध्ये जिंद, हिसार आणि हंसी या जिल्ह्यांचा समावेश आहे. याअगोदर सोनीपत आणि गोहानामध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.