शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

हसन अलीनंतर ‘ईडी’ आता कुरेशीच्या मागे

By admin | Updated: March 24, 2016 00:45 IST

संपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गाडण्यात आलेल्या जुन्या प्रकरणांशी संबंधित सर्व फायलींवरील धूळ झटकण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीसंपुआ सरकारच्या दहा वर्षांच्या राजवटीत गाडण्यात आलेल्या जुन्या प्रकरणांशी संबंधित सर्व फायलींवरील धूळ झटकण्याचे काम मोदी सरकारने सुरू केले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गेल्या महिन्यात पुण्यातील घोडे व्यापारी हसन अली यांच्याशी संबंधित करचोरी आणि हवाला व्यवहाराबद्दलच्या प्रकरणांच्या फायली पुन्हा उघडल्या होत्या आणि आता दिल्लीतील मांस निर्यातदार मोईन अख्तर कुरेशी हे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत.ईडीने पुन्हा एकदा हसन अलींच्या पुणे आणि अन्य शहारांमधील प्रतिष्ठानांवर छापे घातले आहेत. ईडीचे संचालक कर्नल सिंग यांनी ईडीच्या प्रादेशिक प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांच्या फायलींवरील धूळ झटकण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. यासोबतच अनेक काँग्रेस नेत्यांसोबत निकटचे संबंध असलेले मोईन अख्तर कुरेशी यांच्याविरुद्धच्या सर्व प्रकरणांचा पुन्हा तपास करण्याचा निर्णय आयकर विभाग आणि ईडीने घेतल्याचे समजते. आयकर विभागाने करचोरीच्या संदर्भात दंड आकारण्याबाबतची नोटीस जारी केली होती; परंतु नंतर या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला नाही. एवढेच नव्हे तर कुरेशी यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही.डून स्कूलचे माजी विद्यार्थी असलेले ५७ वर्षीय कुरेशी हे करचोरी आणि आपल्या कंपन्यांची उलाढाल कमी दाखविण्याच्या संदर्भात दीर्घकाळापासूनच आयकर विभागाच्या रडारवर आहेत. आयकर विभागाने केवळ कुरेशी यांनाच नव्हे, तर सीबीआयचे माजी संचालक ए. पी. सिंग आणि त्यांच्या पत्नीला कारणे दाखवा नोटीस जारी करणे हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. कुरेशी हे ए. पी. सिंग यांच्या पत्नीचे नातेवाईक आहेत. कुरेशी यांच्या निवासस्थान व कार्यालयांवर छापे घालण्यात आल्यानंतर आयकर विभागाने त्यांची रोख, दागिने आणि बँकेतील जमाठेवींसह २० कोटींची संपत्ती गोठवली होती. सिंग आणि कुरेशी यांच्या दरम्यान झालेल्या दूरध्वनीवरील आणि मोबाईलवरील संभाषणाचा विस्तृत तपशीलही आपण मिळविल्याचा दावा आयकर विभागाने केला आहे.