शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांनंतर आता पदाधिकारी हटाव

By admin | Updated: June 20, 2014 03:12 IST

अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्थांमधील उच्चपदस्थ अधिका:यांना पदमुक्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यापूर्वीच्या संपुआ सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.

शीलेश शर्मा - नवी दिल्ली
भाजपाच्या नेतृत्वातील मोदी सरकारने राज्यपाल हटाव मोहिमेनंतर आता अनेक महत्त्वाच्या सरकारी संस्थांमधील उच्चपदस्थ अधिका:यांना पदमुक्त करण्याचे कार्य हाती घेतले आहे. यापूर्वीच्या संपुआ सरकारने त्यांची नियुक्ती केली होती.
याच शृंखलेत आज गुरुवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे उपाध्यक्ष शशिधर रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी रेड्डी यांना सरकारची इच्छा बोलून दाखविताच त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता लगेच राजीनामा देऊन टाकला. महत्त्वाच्या पदांवरून हटविल्या जाणा:या अधिका:यांच्या यादीत एकटे शशिधर रेड्डीच नाहीत. भारतीय सांस्कृतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. कर्णसिंह, महिला आयोगाच्या अध्यक्ष ममता शर्मा यांच्यासह अनेक आयोगांचे अध्यक्ष आणि नामनियुक्त सदस्यांचा यात समावेश आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कार्मिक मंत्रलयासह इतर सर्व मंत्रलयांना अशी यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे. संपुआ सरकारने महत्त्वाच्या सरकारी आणि गैरसरकारी पदांवर नियुक्त केलेल्या लोकांच्या या यादीसोबतच त्यांचा आणखी किती कार्यकाळ शिल्लक आहे तसेच कशा पद्धतीने त्यांना पदमुक्त करता येईल याबाबतही सविस्तर माहितीही मागविण्यात आली आहे. 
 
-या सर्व पदांवर आपल्या पसंतीचे लोक नियुक्त करण्याची सत्ताधारी भाजपाची मनीषा  आहे. 
-सरकारच्या या कवायतीनंतर काही  राज्यपालांनी पद सोडले असले तरी अनेक राज्यपाल सहजासहजी पद सोडण्यास राजी नाहीत. 
-उलट न्यायालयात दाद मागण्याच्या दृष्टीने कायदेशीर सल्लामसलत करीत आहेत. 
-यात महाराष्ट्र, केरळ आणि बंगालचे राज्यपाल आहेत.