शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसानंतर पाणी पुरवठय़ाचा प्रस्ताव(पानावर वाचले) टंचाई आढावा: आलम?ीच्या पाण्याने संकट टाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2015 01:37 IST

सोलापूर : उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास विलंब झाल्यास 8 सप्टेंबरपासून चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे.

सोलापूर : उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यास विलंब झाल्यास 8 सप्टेंबरपासून चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे.
औज बंधार्‍यातील पाणी पातळी घटल्याने व उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय होण्यास विलंब लागल्याने आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांनी पाणी पुरवठा विभागाची शुक्रवारी बैठक घेतली. बैठकीत सार्वजनिक आरोग्य अभियंता गंगाधर दुलंगे यांनी औज बंधार्‍याची सद्यस्थिती मांडली. 2. 25 मीटर पाणी पातळी असून, 15 दिवस पाणी पुरणार आहे. आलम?ीच्या पाण्याने सोलापूरकरांचे जलसंकट काही प्रमाणात दूर केले आहे. आलम?ीतून इंडी कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. जादा झालेले पाणी औज बंधार्‍यात आले आहे. 1. 8 मीटरवर आलेली पातळी दोन दिवसात 2.30 मीटरवर गेली आहे. याशिवाय पाणी सोडल्याने कर्नाटक शेतकर्‍याकडून उपसा घटला आहे. 14 सप्टेंबरला उजनीतून पाणी सोडले तरी पाणी पोहोचण्यास आठ दिवस लागणार असल्याने तीन दिवस पाणी कपात करावी लागणार आहे. त्या आधी पाणी सोडण्यात आले तर मात्र ही अडचण येणार नाही. चौथा पंप बंद करून ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पावसाची स्थिती अशीच राहिली तर मात्र भविष्यात जलसंकट उभे ठाकणार आहे. त्यामुळे संभाव्य टंचाई लक्षात घेता आत्तापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे आयुक्त काळम?पाटील म्हणाले. एमआयडीसीच्या पाण्यात कपात करावी लागेल. बांधकामासाठी पाण्याचा वापर टाळावा. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन केले आहे.
इन्फो..
जिल्हाधिकार्‍यांच्या टिप्स
मुंबईत जलसंपदा मंत्र्याकडे झालेल्या बैठकीतील चर्चेवरून जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी महापालिका आयुक्त विजयकुमार काळम?पाटील यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पाण्याच्या काटकसरीबाबत टिप्स दिल्या. संभाव्य जलसंकट ओळखून उपाययोजना करण्याची त्यांनी सूचना केली. त्याप्रमाणे महापालिकेने नियोजन सुरू केले आहे.
इन्फो
7 रोजी पुण्यात होणार बैठक
सोलापूरच्या पाणी पुरवठय़ासंदर्भात जलसंपदा मंत्री शिवतारे यांनी 7 सप्टेंबर रोजी पुण्यातील विर्शामगृहात बैठक आयोजित केली आहे. बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, आयुक्त, महापौर, उपमहापौर, एनटीपीसीचे व्यवस्थापकीय संचालक, लाभक्षेत्र विकास प्राधीकरणचे अधीक्षक अभियंता यांना बैठकीला बोलाविण्यात आले आहे.