शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

प्रत्येक वापरानंतर रेल्वेतील ब्लँकेट धुतले जाणार

By admin | Updated: March 13, 2016 22:47 IST

रेल्वेतील घाणेरडा वास येणारी ब्लँकेटस् आता भूतकाळातील बाब ठरणार आहे. एकदा वापरल्यानंतर ब्लँकेट धुण्याचा नवा दंडक रेल्वे प्रथमच घालून देणार आहे.

नवी दिल्ली : रेल्वेतील घाणेरडा वास येणारी ब्लँकेटस् आता भूतकाळातील बाब ठरणार आहे. एकदा वापरल्यानंतर ब्लँकेट धुण्याचा नवा दंडक रेल्वे प्रथमच घालून देणार आहे.जुनी जाड ब्लँकेट जाऊन आता हलकी नव्या डिझाईनची मऊ ब्लँकेट वातानुकूलित डब्यातील प्रवाशांना पुरविली जाणार आहे. सध्या ब्लँकेट महिन्यातून दोनदा किंवा कधी एकदाच धुतली जातात. राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेने (एनआयएफटीने) डिझाईन केलेली नवी ब्लँकेटस् प्रत्येक वापरानंतर धुतली जाणार असून ती बराच काळ टिकू शकतात, असे रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.एनआयएफटीने धाग्यांचे ब्लँकेट हे वूल (उनी कापड) आणि कापसापासून तयार केले असून ते दररोज धुता येते. ब्लँकेटच्या वास येण्याच्या तक्रारीवर तोडगा काढण्यात येत असून रेल्वेने या ब्लँकेटच्या वापराला मंजुरी दिली आहे. अशा ब्लँकेटचा काही निवडक रेल्वेमध्ये प्रथम वापर केल्यानंतर व्याप्ती वाढविली जाईल. ब्लँकेट आणि बेडरोल धुण्यासाठी लाँड्रीची वाढती गरज लक्षात घेता अनेक रेल्वेस्थानकांवर ती सोय केली जाईल. केवळ ब्लँकेट नव्हे, तर संपूर्ण बेडरोल रंगसंगतीसह सादर करण्याची योजना एनआयएफटीने आखली आहे. त्यामुळे बेडशीट आणि उशांना (पिलो कव्हर) नवे रंगरूप लाभेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)रेल्वेने अलीकडेच ई- बेडरोल सुविधा सुरू केली आहे. आॅनलाईन तिकीट बुक करताना प्रवाशांना बेडरोलचा पर्याय उपलब्ध असेल. स्लीपर कोचमधील प्रवाशांनाही रेल्वेस्थानकावर बेडरोल किट दरानुसार वापरता येईल किंवा तिकीट खरेदी करतानाही ती सोय राहील. सध्या वातानुकूलित डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांसाठीच मोफत बेडरोलची सुविधा आहे.