शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या विजयानंतर यूपीत मुस्लिमांना गाव सोडण्याची धमकी

By admin | Updated: March 16, 2017 16:23 IST

उत्तर प्रदेशमध्ये बरेली जिल्ह्यात एका गावात मुस्लिमांविरोधात पोस्टर लावण्यात आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

ऑनलाइन लोकमतबरेली, दि. 16 - उत्तर प्रदेशमध्ये बरेली जिल्ह्यात एका गावात मुस्लिमांविरोधात पोस्टर लावण्यात आल्यानं तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या पोस्टरमध्ये लिहिलं आहे की, उत्तर प्रदेशमध्ये आता भाजपाचं सरकार आलं आहे. आता गावातील हिंदू तेच करतील जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतःच्या देशात मुस्लिमांसोबत करतात. बरेलीपासून 70 किलोमीटर दूरवर जियानागला गावात मुस्लिमांविरोधात हे पोस्टर लावण्याचे प्रकार राज्यात भाजपानं प्रचंड विजय मिळवल्यानंतर समोर आले आहेत. गावातल्या जवळपास अनेक ठिकाणी हे पोस्टर चिकटवण्यात आले आहेत. ट्रम्प जे काम अमेरिकेत करत आहेत, तेच काम आम्ही इथे करणार आहोत. कारण इथे आता भाजपा सत्तेत आहे, असं या पोस्टरमध्ये छापण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पोस्टरमध्ये स्थानिक खासदाराचंही नाव टाकण्यात आलं आहे. पोस्टरमधून गावातील मुस्लिमांना या वर्षाच्या शेवटीपर्यंत गाव सोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलीस आणि प्रशासनानं सर्वाधिक पोस्टर हटवले आहेत. मात्र अद्यापही काही पोस्टर भिंतीवर लावलेले पाहायला मिळत आहेत. सर्व पोस्टरवर एकसारखाच संदेश लिहिण्यात आला आहे. पोस्टरमध्ये असंही लिहिलं आहे की, यंदाच्या वर्षात मुस्लिमांनी गाव न सोडल्यास त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागणार आहे. मात्र गाववाल्यांना हे कोणी केलं आहे हे माहीत नाही. गावातल्या एका ग्रामसेवकानं सांगितलं की, आम्ही रात्री झोपण्यासाठी गेलो होते. सकाळी उठून पाहतो तर हे सर्व पोस्टर भिंतींवर चिकटवण्यात आले होते. गाववाल्यांनी विरोध दर्शवल्यानंतर याची माहिती पोलिसांत देण्यात आली. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच गावातील पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. गावात पोलिसांनाही तैनात करण्यात आलं आहे. 2500 लोकसंख्या असलेल्या गावात 200 मुस्लिम राहतात. विशेष म्हणजे याआधी अशा प्रकारच्या घटना गावात कधीच घडल्या नाही. आम्ही सर्व गावात शांती आणि सलोख्यानं राहतो. हे काम काही समाजकंटकांनी केलं आहे, असंही गावकरी म्हणाले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिका-यांसहीत पोलीस अधिकारी लागोपाठ गावाचा दौरा करत आहेत. मात्र अजूनही हे कृत्य कोणी केलं आहे हे पोलिसांना समजलं नाही. बरेलीचे एसपी यमुना प्रसाद म्हणाले की, प्रिंटिंग प्रेस आणि फोटोरेस्टमध्ये काम करणा-या तरुणांकडे आम्ही चौकशी करत आहोत. मात्र अद्यापही आम्ही कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही.