शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पाक अखेर ताळ्यावर!

By admin | Updated: January 8, 2016 03:57 IST

पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आम्ही पुरविली आहे, आता तडकाफडकी निर्णायक कारवाई करा, त्यावरच चर्चा निर्भर राहील

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांचा सहभाग असल्याची गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेली माहिती आम्ही पुरविली आहे, आता तडकाफडकी निर्णायक कारवाई करा, त्यावरच चर्चा निर्भर राहील, असे भारताने ठणकावल्यानंतर अखेर पाकिस्तान ताळ्यावर आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन भारताने दिलेल्या माहितीवर वेगाने काम करण्याचे फर्मान पाकिस्तानी अधिकाऱ्यांना सोडले. शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दूरध्वनीवर बोलणे झाल्यानंतर भारताने पाकला तातडीने व निर्णायक कारवाईची आम्ही वाट बघत आहोत, असे म्हटले होते. शिवाय अमेरिकेनेही पाकने दिलेला शब्द पाळावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत दबाव टाकला होता.शरीफ यांनी बोलाविलेल्या या बैठकीत राष्ट्रीय आणि विभागीय सुरक्षेवर चर्चा झाली, असे पंतप्रधानांच्या कार्यालयाने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. बैठकीनंतर, भारताने पठाणकोट हल्ल्यासंदर्भात जी माहिती पाकला दिली त्यावर चर्चा होऊन त्याआधारे वेगाने काम करण्यास सांगण्यात आले. पठाणकोट हल्ल्यामध्ये सहभाग आढळणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, असेही त्याने सांगितले. मात्र आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारताने दिलेली माहिती केवळ दूरध्वनी क्रमांक असून ती पुरेशी नाही व पाकने भारताकडे आणखी माहिती मागवली आहे. पाकिस्तानने ठोस कारवाई करावी असे भारताने म्हटले असले तरी त्यासाठी कालमर्यादा ठरवून दिली नाही. पठाणकोट येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे सीमापार दहशतवादी कारवायांकडे नव्याने लक्ष वेधले गेले आहे. चेंडू पाकिस्तानच्या अंगणात आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करताना ठोस कारवाई करण्याचे सुचविले आहे. शरीफ यांनी ठोस कारवाईचे आश्वासन दिले आहे. आम्हाला त्यांच्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे, असे स्वरूप यांनी नमूद केले.लाहोर भेटीमुळे सकारात्मक वातावरणपंतप्रधान मोदी यांनी गेल्या महिन्यात लाहोरला भेट दिल्यानंतर दोन देशांच्या संबंधांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. पठाणकोट येथील हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर ठोस कारवाई केली जावी, यासाठी भारत प्रयत्नशील राहील, असेही ते म्हणाले.- आणखी वृत्त/१०पठाणकोट हवाई तळावर झालेल्या हल्ल्याचे मूळ पाकिस्तानात असल्याचे स्पष्ट होताच इस्लामाबाद येथे १५ जानेवारी रोजी विदेश सचिव एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे समकक्ष अझीझ अहमद चौधरी यांच्यासोबत होणारी चर्चा अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकल्याचे संकेत मिळाले आहेत. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी पत्रकार परिषदेत भारताची भूमिका स्पष्ट केली; मात्र पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार करूनही त्यांनी चर्चा होणार की नाही याबाबत भाष्य टाळले. सचिव स्तरावरील चर्चेपूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावर चर्चा करणार काय, या मुद्द्यावर ते म्हणाले की, याबाबत पाकिस्तानशी अद्याप चर्चा झालेली नाही. पाकिस्तानसोबतच्या विदेश धोरणात सातत्याचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. -आणखी वृत्त/१२