शहरं
Join us  
Trending Stories
1
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
2
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
3
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
4
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
5
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
6
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
7
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
8
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
9
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
10
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार
11
नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीची विक्री करून परस्पर लावले लग्न, पित्याने घेतला गळफास
12
"सत्यनारायण पूजेसाठी दिवसभर उपवास अन् नंतर...", शेफालीचा पती पराग त्यागीने दिली माहिती
13
विठ्ठल दर्शनाची आस अधुरीच राहिली; वारीतच २ वारकऱ्यांवर काळाचा घाला,  हरिनामाचा गजर शेवटचा ठरला
14
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
15
शाळेत जायला रस्ताच नाही, कोणत्या 'भाषेत' सांगितल्यावर ही समस्या सुटेल? फांदीचा आधार घेत पार करतात नदी...
16
Share Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; ट्रेंट, इटर्नलमध्ये तेजी; एनटीपीसी, Reliance घसरले
17
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
18
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
19
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
20
Paresh Rawal : "आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?

अपघातानंतर एसटी चालक-वाहकाला बेदम मारहाण

By admin | Updated: July 6, 2015 23:51 IST

- रत्नागिरीजवळील घटना : निषेधार्थ बसफेर्‍या बंद केल्याने वाहतूक ठप्प

- रत्नागिरीजवळील घटना : निषेधार्थ बसफेर्‍या बंद केल्याने वाहतूक ठप्प
रत्नागिरी : तालुक्यातील साखरतर येथे एका वृद्धाच्या पायावरून एसटी बसचे चाक गेल्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने बसचालक आणि महिला वाहकाला बेदम मारहाण केली. या घटनेच्या निषेधार्थ एसटी चालक-वाहकांनी बसफेर्‍या बंद केल्याने तब्बल सात तास शहरी आणि सहा तास ग्रामीण वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्यात असंख्य प्रवाशांचे विशेषत: शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल झाले.
कासारवेली येथे सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात जैनुद्दीन शिरगावकर (६५) हे जखमी झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या साखरतर ग्रामस्थांनी बसचालक सचिन सावंत आणि वाहक मयूरी सुर्वे यांना बेदम मारहाण केली. जोपर्यंत जखमीवर उपचार होत नाहीत, तोपर्यंत चालक-वाहक आणि बस जागची हलू देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. तोपर्यंत घटनास्थळी पोहोचलेल्या एसटी अधिकार्‍यांनी शिरगावकर यांना शासकीय रुग्णालयात आणले. उपचार सुरू झाल्यानंतर बस अपघातस्थळावरून सोडण्यात आली.
या मारहाणीचे वृत्त तत्काळ रत्नागिरी एसटी आगारापर्यंत आले. त्यामुळे चालक-वाहक एकत्र झाले आणि त्यांनी शहरी बस वाहतूक बंद केली. सकाळी दहा वाजल्यापासून ही वाहतूक ठप्प झाली. पाठोपाठ अकरा वाजता ग्रामीण फेर्‍याही बंद करण्यात आला. चालक-वाहकाला मारहाण करणार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करा आणि त्यांना अटक करा, अशी मागणी करीत सर्वच चालक-वाहकांनी चक्काजाम केला. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी सामंजस्याची भूमिका घेत चालक-वाहकांची समजूत काढली. चर्चेच्या तीन फेर्‍यांनंतर सायंकाळी पाच वाजता वाहतूक पूर्ववत सुरू झाली. (प्रतिनिधी)