नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) एक विद्यार्थी सहा दिवसांपासून बेपत्ता असून, त्याच्या निषेधार्थ जेएनयूतील विद्यार्थी संघटनेने कुलगुरूंसह १२ अधिकाऱ्यांना प्रशासकीय इमारतीत दोन दिवसांपासून बंदिस्त केले आहे. तर या विद्यार्थ्यांविरुद्ध कारवाईचा इशारा कुलगुरू एम. जगदेश कुमार यांनी दिला आहे. विद्यार्थ्यांनी केवळ दोन अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ दिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
विद्यार्थी बेपत्ता प्रकरणानंतर जेएनयूत गोंधळ कायम
By admin | Updated: October 21, 2016 01:59 IST