शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दुष्काळात मटक्याचा झटका

By admin | Updated: April 8, 2016 00:05 IST

शिवराज बिचेवार, नांदेड दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असताना, अवैध इमानदारीचा व्यवसाय असलेल्या मटक्याचा झटका मात्र तेजीत आहे़

शिवराज बिचेवार,  नांदेड दुष्काळी परिस्थितीमुळे बाजारपेठ मंदीच्या सावटाखाली असताना, अवैध इमानदारीचा व्यवसाय असलेल्या मटक्याचा झटका मात्र तेजीत आहे़ ऋतु कोणताही असो, परिस्थिती काहीही असो परंतु कल्याण-मिलनच्या या खेळावर नियंत्रण ठेवण्यात पोलिस यंत्रणेला अपयश येत असून त्यामुळे अनेक कुटुंबे उद्धवस्त होत आहेत़ जिल्ह्यात मागील अनेक वर्षापासून मटक्याचा हा व्यवसाय सुरु आहे़ या अवैध धंद्याबाबत थोडा गाजावाजा झाला की, लगेच पोलिस प्रशासनाकडून किरकोळ बुकीवर कारवाई करुन आपली पाठ थोपटण्यात येते़ परंतु या व्यवसायाचे बडे मासे मोकळेच राहतात़ त्यात अशा कारवाईनंतर प्रत्यक्षात पुन्हा फायदा पोलिसांचाच होत असल्याचेही बुकीचे म्हणणे आहे़ नांदेड शहरात लोकमत चमुने पाहणी केली असता, सर्वच ठिकाणी मटक्याचे अड्डे राजरोसपणे सुरु असल्याचे पहावयास मिळाले़ शहरातील शिवाजीनगर भागात एका टपरीवर काही मिनिटांच्या अवधीने चोरट्या पावलाने एक-एक जण येत होता़ अन् आपले आकडे सांगून निघून जात होता़ असाच प्रकार गोकुळनगर, अण्णाभाऊ साठे चौक, गणेशनगर वाय पॉर्इंट, जयभीनगर, नवी आबादी, तेहरानगर आदी परिसरात पहायला मिळाला़ प्रत्येक ठिकाणी पानटपरी, छोटे किराणा दुकान, टेलरिंगचे दुकान, केश कर्तनालय, चहाची टपरी या ठिकाणी सर्रासपणे मटका स्विकारला व लावला जात असल्याचे पहावयास मिळाले़ शहरात आजघडीला अशाप्रकारचे २०० हून अधिक मटक्याचे अड्डे असल्याचे आढळले़ झोपडपट्टी भागात मटक्याचे व्यसन अनेकांना असल्याचे दिसत आहे़ १५० ते २०० रुपये रोजंदारीवर काम करणारे बहुतेक मजूर झटपट श्रीमंत होण्याच्या नादात दिवसातून एक तरी, आकडा लावून नशीब आजमावित असल्याचे दिसून येते़ परंतु दिवसेंदिवस झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेकांची कुटुंबे उद्धवस्त झाली असल्याचे पाहणीत आढळून आले आहे़ विशेष म्हणजे पोलिसांनाही मटका बुकींची इत्यंभूत माहिती असते़ अवैध व्यवसायातही आधुनिकताआजघडीला सर्वत्र मोबाईल, इंटरनेटचा वापर करण्यात येत आहे़ मटक्याच्या अवैध व्यवसायातही मोबाईल आणि इंटरनेटमुळे मटका बुकी आणि ग्राहकांची मोठी सोय झाली आहे़ यापूर्वी आपण लावलेला आकडा आला की नाही? किंवा तो लावण्यासाठी मटका बुकींकडे जावे लागत होते़ परंतु आता मोबाईलवरुन मटका स्विकारणे आणि लावणे सुरु आहे़ त्याचबरोबर इंटरनेटवर बसून कुठेही नेमका कोणता आकडा आला अन् किती रुपयांचा आला याचीही माहिती मिळत आहे़ कल्याण-मिलनजिल्ह्यात दुष्काळामुळे एक-एक व्यवसाय बंद पडत आहेत़ बाजारात आर्थिक उलाढाल नसल्यामुळे व्यापारी हैराण झाले आहेत़ शेतकऱ्यांनी तर कर्जाला कंटाळून आत्महत्येसारखा मार्ग स्विकारला आहे़ अशा परिस्थितीत अवैध इमानदारीचा हा धंदा मात्र तेजीत आहे़ गल्ली बोळासह उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरातही आता धंद्याने पाय पसरले आहेत़ पोलिस प्रशासन जोपर्यंत गंभीरपणे अशा जुगाऱ्यांवर कारवाई करणार नाही तोपर्यंत या व्यवसायाचे समुळ उच्चाटन होणे शक्य नाही़