शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

हवाई लक्ष्यवेधी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

By admin | Updated: September 21, 2016 06:34 IST

तांत्रिक सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या हवेतील लक्ष्याचा जमिनीवरून वेध घेणाऱ्या लांब पल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राच्या मंगळवारी दोन चाचण्या घेण्यात आल्या

भुवनेश्वर : इस्राएलच्या तांत्रिक सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या हवेतील लक्ष्याचा जमिनीवरून वेध घेणाऱ्या लांब पल्ल्याच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्राच्या मंगळवारी दोन चाचण्या घेण्यात आल्या. ़यशस्वी प्रायोगिक चाचण्यांनंतर ही प्रक्षेपणास्त्रे तिन्ही सैन्यदलांमध्ये दाखल होतील. त्यामुळे भारताच्या युद्धसज्जता आणखी मजबूत होईल.बालासोर समुद्रकिनाऱ्यापासून जवळ असलेल्या चांदीपूर-आॅन-सी येथील एकात्मिक प्रक्षेपण तळावरून सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळा या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. एक काल्पनिक वैमानिकरहीत विमान हल्ल्याच्या टप्प्यात आल्याचे संकेत संलग्न राडार यंत्रणेने देताच क्षेपणास्त्र तळावरून झेपावले आणि त्याने लक्ष्याचा वेध घेतला. सामरिकदृष्ट्या हे सर्व किती अचूकतेने पार पडले, याचे तांत्रिक निष्कर्ष लगेच समजू शकले नाहीत.भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) आणि इस्राएल एअरोस्पेस इंडस्ट्रिज (आयएआय) यांनी संयुक्तपणे ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित केली असून तिची पूर्णपणे जोडणी करून प्रथमच चाचणी घेण्यात आली. यात प्रत्यक्ष क्षेपणास्त्राखेरीज लक्ष्याचा अचूक वेध घेऊन त्यानुसार क्षेपणास्त्राची मार्गनिश्चिती करणारी बहुद्देशीय ‘सर्व्हेलन्स अ‍ॅण्ड थ्रेट अ‍ॅलर्ट राडार सिस्टिम’ (एमएफ-स्टार) राडार यंत्रणाही आहे.या चाचणीच्या वेळी खबरदारीचा उपाय म्हणून प्रक्षेपण तळाच्या २.५ किमी परिसरात राहणाऱ्या सुमारे ३,५०० गावकऱ्यांचे जिल्हा प्रशासनाने तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये स्थलांतर केले. तसेच चाचणी पूर्ण झाल्याचा संदेश मिळेपर्यंत बालासोर, भद्रक आणि केंद्रपाडा या किनारी जिल्ह्यांतील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचाही इशारा देण्यात आला. (वृत्तसंस्था)>गुणवैशिष्ठ्ये आणि उपयोग>माऱ्याचा पल्ला: ६० ते ८० किमी.कोणत्याही संभाव्य हवाई धोका हाणून पाडण्याची क्षमता.क्षेपणास्त्रावरील स्फोटके-६० किलो.एकूण वजन: २.७ टनवेग: २ मॅच (प्रति सेकंद १ किमी)संरक्षणदलांची संवेदनशील आस्थापने व गर्दीच्या शहरांच्या हवाई संरक्षणासाठी प्रभावी.