शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव आरोपींबद्दल मवाळ धोरणाचा सल्ला

By admin | Updated: October 14, 2015 00:59 IST

मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींबाबत मवाळ धोरण अवलंबण्याचा सल्ला एनआयएचे पोलीस अधीक्षक सुहास वारके यांनी दिला होता

नवी दिल्ली : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींबाबत मवाळ धोरण अवलंबण्याचा सल्ला एनआयएचे पोलीस अधीक्षक सुहास वारके यांनी दिला होता, असा खळबळजनक दावा माजी सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल प्रतिज्ञापत्रात केला आहे.रालोआ सत्तेवर आल्यानंतर मालेगावप्रकरणी मवाळ धोरण अवलंबण्यात आल्यामुळे हे प्रकरण कमकुवत बनल्याचा आरोपही त्यांनी केला. एनआयएची ही भूमिका न्यायालयीन प्रक्रियेसाठी बाधक असून या संस्थेवर न्यायालयीन अवमानना कारवाई सुरू करावी, अशी विनंती एका याचिकेत करण्यात आली आहे. एक संदेशकर्ता या नात्याने एनआयए मुंबई शाखेचे अधिकारी सुहास वारके यांनी न्यायालयीन प्रशासनात हस्तक्षेप केल्याचे सालियन यांनी नमूद केले. मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेले हे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयाला याचिकेसह सादर करण्यात आले.जून २०१४ च्या तिसऱ्या आठवड्यात वारके यांनी मला तसा संदेश दिला होता. तीन महिन्यांपूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सालियन यांनी याबाबत गौप्यस्फोट केला; मात्र त्या अधिकाऱ्याचे नाव उघड करण्याचे टाळले होते.मुंबईचे रहिवासी डॉ. संजय लाखे पाटील यांनी एनआयएविरुद्ध अवमानना कारवाई करण्याची विनंती करतानाच सालियन यांचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयाला सादर केले होते. अ‍ॅड. चिराग एम. श्रॉफ यांनी हे प्रकरण प्रलंबित असल्याकडे लक्ष वेधले. या प्रकरणाकडे लक्ष वेधणाऱ्या दोन जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर न्या. जे. चेलामेश्वर यांनी एनआयए आणि महाराष्ट्र सरकारला उत्तर मागितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)