नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस अपात्र आहे, असा सल्ला देणारे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यावर काँग्रेसने शनिवारी जोरदार हल्ला चढवला़ अॅटर्नी जनरल यांचा हा सल्ला केवळ राजकीय नेतृत्वाला खूश करण्यासाठी असल्याचे काँग्रेसने म्हटल़े
पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा यांनी या मुद्यावर रोहतगी यांच्यावर तोफ डागली़ सर्वात मोठा विरोधी पक्ष या नात्याने काँग्रेसला लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद मिळायलाच हव़े काँग्रेसला हे पद मिळण्यापासून रोखू शकणारा असा कुठलाही कायदा नाही़
अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी याबाबत दिलेला सल्ला निव्वळ राजकीय नेतृत्वाला खूश करण्यासाठी दिलेला सल्ला आहे आणि हे अतिशय दुर्दैवी आह़े अॅटर्नी जनरलने कुठल्या कायद्याचा आधार देऊन हा सल्ला दिला, हे अनाकलनीय आह़े
एक कायद्याचा जाणता या नात्याने या पदावरील व्यक्तीने निरपेक्षपणो सल्ला देणो अपेक्षित आहे, असे शर्मा यावेळी म्हणाल़े लोकसभाध्यक्ष अॅटर्नी जनरलचा सल्ला धुडकावून लावतील, अशी आशा आम्ही करतो, असेही ते म्हणाल़े
अॅटर्नी जनरलनी काहीही सल्ला दिला असला तरी लोकसभा अध्यक्षा सुमित्र महाजन यांनी स्वत:च्या विवेकबुद्धीने रास्त निर्णय करणो अपेक्षित आहे. पण सरकार लोकसभा अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे, असाही शर्मा यांनी आरोप केला.
मीडियातील वृत्तानुसार, अॅटर्नी जनरल यांनी लोकसभाध्यक्ष सुमित्र महाजन यांच्याकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्यावर आपले मत पाठवले आह़े
सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या (543) 1क् टक्के जागा (55) नसल्याने काँग्रेसला लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद देता येणार नसल्याचे अॅटर्नी जनरल यांनी यात म्हटले आह़े काँग्रेसकडे केवळ 44 जागा आहेत़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
कोर्टाचा मार्ग
अजूनही खुला
च्विरोधी पक्षनेतेपद मिळायलाच हवे, ही काँग्रेसची ठाम भूमिका अद्यापही कायम आहे. अन्यायाने ते नाकारले गेले तर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याची शक्यता पक्षाने अद्याप सोडून दिलेली नाही, असे सांगून आनंद शर्मा म्हणाले की, लोकपाल, माहिती आयुक्त, मुख्य दक्षता आयुक्त इत्यादी पदांवरील नेमणुकांसाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा सहभाग कायद्यानेच अनिवार्य केलेला आहे.
च् विरोधी पक्षाच्या सहभागशिवाय केल्या गेलेल्या या नेमणुका कायद्याच्या दृष्टीने कलुषित ठरतील.