शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतिपदासाठी अडवाणींचे पोस्टर्स

By admin | Updated: June 19, 2017 01:21 IST

भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार कोण, या हालचालींना सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात वेग आला असतांना, लालकृष्ण अडवाणी हेच राष्ट्रपतीपदासाठी सर्वात

सुरेश भटेवरा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा उमेदवार कोण, या हालचालींना सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोटात वेग आला असतांना, लालकृष्ण अडवाणी हेच राष्ट्रपतीपदासाठी सर्वात उपयुक्त व श्रेष्ठ उमेदवार असल्याचे पोस्टर्स रविवारी अचानक भाजपचे मुख्यालय असलेल्या अशोका रोडवर, संसदेकडे जाणाऱ्या रायसीना मार्गासह अनेक ठिकाणी झळकले. तथापि मुख्यालयाच्या भिंतीवर लागलेले हे पोस्टर्स काही तासातच फाडून त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली. राष्ट्रपतीपदासाठी लालकृष्ण अडवाणींचे नाव गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. जोडीला मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज यांची नावेही चर्चिली गेली. राजधानीच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा विषय केंद्रस्थानी असतांना, अचानक अडवाणींच्या नावाचे समर्थन करणारे पोस्टर्स रविवारी झळकले. पोस्टर्सवरील मजकूरात‘भारतीय जनता पक्षाचे जनक, लोहपुरूष तथा भारताच्या राष्ट्रीय राजकारणातले आदरणीय नेते लालकृ ष्ण अडवाणी हेच राष्ट्रपतीपदासाठी सर्वाधिक उपयुक्त व श्रेष्ठ उमेदवार आहेत’ असा उल्लेख आहे. पोस्टर्स प्रायोजित करणाऱ्याचे नाव अशोक तंवर आहे. जो स्वत: ला गुजर समाज तथा किसान नेत्यांचा संयोजक म्हणवतो. तथापि तंवर यांच्या पोस्टर्सवरील प्रस्तावाला काही तासातच केराची टोपली मिळाल्यामुळे अडवाणी यांचे नाव सत्ताधाऱ्यांच्या अग्रक्रमातून खरोखर बाद झाले काय? याची चर्चा मात्र सुरू झाली.