शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अडवाणींचे पुन्हा टीकास्त्र

By admin | Updated: June 29, 2015 00:10 IST

नेत्यांनी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. हवाला कांड प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगत लालकृष्ण आडवाणींनी मोदी सरकारला टोला लगावला आहे.

नवी दिल्ली : देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करून केंद्रातील रालोआ सरकार आणि भाजपला अडचणीत टाकणारे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. नेत्यांनी प्रामाणिकपणा व विश्वासार्हता टिकवून ठेवण्याची गरज आहे. हवाला कांड प्रकरणात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगून अडवाणी यांनी ललितगेट प्रकरणात आरोप लावण्यात येत असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना अप्रत्यपणे राजीनामा देण्याचा सल्ला दिला.आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांना मदत केल्यावरून स्वराज व राजे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरीत असतानाच अडवाणी म्हणाले की, ‘सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि विश्वासार्हता राखणे आवश्यक आहे. हवाला कांडात माझे नाव गोवण्यात आले त्यावेळी मी लगेच पदाचा राजीनामा दिला होता.’ एका दैनिकाला मुलाखत देताना अडवाणी बोलत होते. ‘१९९६ मध्ये हवाला कांडप्रकरणी माझ्याविरुद्ध आरोप लावण्यात आले होते. त्यावेळी मी खासदारकीचा राजीनामा दिला होता. हे आरोप खोटे ठरल्यानंतर मी परत संसदेत आलो,’ असे ते म्हणाले. ‘जेव्हा जैन डायरीच्या आधारावर हवाला कांड प्रकरणात माझ्याविरुद्ध आरोप लावण्यात आले होते, तेव्हा पंडारा मार्गावरील आपल्या निवासस्थानी बसलेला असताना सायंकाळी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी मी तात्काळ अटलबिहारी वाजपेयी यांना फोन करून आपला निर्णय कळविला. त्यांनी मला राजीनामा देऊ नका, अशी सूचनाही केली. जनता निवडणुकीत आम्हाला मतदान करते. त्यामुळे जनतेप्रती प्रतिज्ञाबद्धता असणे आवश्यक आहे,’ असे अडवाणी यांनी स्पष्ट केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)स्वराज आणि राजेंनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे -काँग्रेसहवाला घोटाळ्यात आरोप झाल्यानंतर आपण लगेच राजीनामा दिला होता, असे सांगून लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपच्या मंत्र्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत. स्वराज आणि राजे यांनीही आपापली जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे काँग्रेसचे नेते पी.सी. चाको म्हणाले.४राजीनामा देण्याचा नियम असला पाहिजे का, असे विचारले असता अडवाणी म्हणाले की, मी माझ्याबाबतीत सांगू शकतो. दुसरे काय करतात, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचा काय मुद्दा आहे, हे मला ठाऊक नाही. जनसंघाच्या आधीपासूनच संघाच्या शाखांमधून आम्हाला प्रामाणिकपणाचे धडे दिले जात होते आणि प्रामाणिकपणा हाच सर्वांत मोठा सद्गुण असल्याचे सांगण्यात येत होते. भ्रष्टाचाराबाबत कसलाही समझोता केला जाऊ नये.सत्तारूढ भाजप राजकीय नीतिमत्ता व प्रामाणिकपणाच्या मार्गाने चालण्यास तयार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. अडवाणी यांनीही याबाबत सावध केले आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीत आपल्या लोकांना वाचवायचे आहे. कारवाई केली तर ही प्रक्रिया आणखी वेग घेईल, अशी भाजपला भीती वाटत आहे. -नितीशकुमार, मुख्यमंत्री, बिहार