ऑनलाइन लोकमत
वडोदरा, दि. १७ - प्रेमसंबंधात अडसर ठरणा-या वृद्ध आई-वडीलांची दत्तक मुलीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना वडोदरा येथे उघडकीस आहे. शहरातील मंजालपूर परिसरात राहणा-या श्रीहरी विनोद (वय ६३) आणि त्यांची पत्नी स्नेहा (६०) या दोघांचा त्यांच्या १६ वर्षीय मुलीने खून केला आणि सुमारे ७२ दिवस त्यांचे मृतदेह लपवून ठेवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी त्या मुलीला प्रियकरासह अटक करण्यात आली आहे.
ऑगस्ट महिन्यात त्या मुलीने विनोद व त्यांच्या पत्नीच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळल्या व त्यानंतर प्रियकराच्या मदतीने त्यांची हत्या केली. त्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी ती मुलगी रोज त्यांच्यावर अॅसिड ओतू लागली. मात्र घरातून दुर्गंधी येत असल्याची शेजा-यांनी तक्रार केल्याने पोलिस घरात पोचले असता, त्यांना विनोद व त्यांच्या पत्नीचा मृतदेह आढळला. आई-वडीलांना आपले प्रेमसंबंध मान्य नव्हते, त्यामुळेच आपण त्यांची हत्या केल्याची कबूली दिली.