शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

देवयानींविरुद्ध प्रशासकीय कारवाई

By admin | Updated: December 21, 2014 02:17 IST

देवयानी खोब्रागडे (४०) यांच्याविरुद्ध आता परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘सक्तीच्या प्रतीक्षे’ची शिस्तभंग आणि प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षी अमेरिकेत बनावट व्हिसाप्रकरणी अटक झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या भारतीय मुत्सद्दी देवयानी खोब्रागडे (४०) यांच्याविरुद्ध आता परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘सक्तीच्या प्रतीक्षे’ची शिस्तभंग आणि प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. तथापि, आपण कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचा खुलासा देवयानी यांनी केला आहे.देवयानी खोब्रागडे यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सूचना न देताच आपल्या मुलांसाठी अमेरिकन व्हिसा मिळविल्याचा आरोप आहे. याप्रकरणी विभागीय चौकशी पूर्ण झाली आहे आणि देवयानी यांची ही कृती ‘आचार नियमांचा भंग’ करणारी असल्याचे या चौकशीत आढळून आल्यामुळेच त्यांच्यावर शिस्तभंगासोबत प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. तथापि , या कारवाईचे निश्चित स्वरूप काय आहे, याचा मात्र खुलासा करण्यात आलेला नाही.दरम्यान, परवानगीशिवाय माध्यमाला मुलाखत दिल्याबद्दलही परराष्ट्र मंत्रालयाने देवयानी यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. मंत्रालयाने देवयानी यांना ‘सक्तीच्या प्रतीक्षा श्रेणीत’ ठेवल्याचे समजते. अमेरिकेहून परतल्यानंतर देवयानी या परराष्ट्र मंत्रालयात डेव्हलपमेंट पार्टनरशीप डिव्हिजनमध्ये संचालिका पदावर कार्यरत होत्या.‘सेवा नियमानुसार अज्ञान मुलांचे दोन पासपोर्ट असू शकतात आणि त्यात काहीही गैर नाही’, असे सांगून देवयानी यांनी आपल्या मुलींसाठी अमेरिकन पासपोर्ट घेण्याच्या कृतीचे समर्थन केले. मीडियाला मुलाखत देणे सेवा नियमांच्या कक्षेतच आहे; परंतु तुमचे मत व्यक्तिगत असले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.(लोकमत न्यूज नेटवर्क)कारवाईचे कारण‘माझ्या मुलांचा जन्म अमेरिकेत झाला आणि त्यांना आता अमेरिकन नागरिक मानले जाते’, असे देवयानी खोब्रागडे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने आक्षेप घेतला आणि कारवाई केली. मुले अमेरिकन नागरिक आहेत, याचा अर्थ त्यांच्याजवळ अमेरिकन पासपोर्ट आहे; पण अमेरिकन पासपोर्ट असल्याची माहिती खोब्रागडे यांनी परराष्ट्र मंत्रालयापासून लपवून ठेवल्याचा आरोप आहे.आपण कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही. न्यूयॉर्कमधील आपल्या अटकेबाबत आपण मीडियाकडे केलेले वक्तव्य पूर्णत: व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. आपण अमेरिका-भारत संबंधावरही भाष्य केले नाही. त्यामुळे आपण राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.-देवयानी खोब्रागडे, भारतीय मुत्सद्दी