सीएनएक्ससाठी अतिरीक्त आयुक्त (गुन्हे) सी. एच. वाकडे
By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST
फोटो : लक्ष्मण लॉगिनमध्ये वाकडे नावाने आमचं लग्न झाल्यानंतर वडगाव शेरी भागामध्ये मे १९८३ रोजी आम्ही रहायला आलो. घरामध्ये गणपती बसवायचा हा पत्नीचा आग्रह होता. आम्ही ठरवले की घरामध्ये गणपती बसवायचा. तसे गावाकडे घरात गणपती बसवण्याची पद्धत नव्हती. परंतु आम्ही हा निर्णय घेऊन गणेशोत्सवाला सुरुवात केली. गेली ३२ वर्ष आम्ही ...
सीएनएक्ससाठी अतिरीक्त आयुक्त (गुन्हे) सी. एच. वाकडे
फोटो : लक्ष्मण लॉगिनमध्ये वाकडे नावाने आमचं लग्न झाल्यानंतर वडगाव शेरी भागामध्ये मे १९८३ रोजी आम्ही रहायला आलो. घरामध्ये गणपती बसवायचा हा पत्नीचा आग्रह होता. आम्ही ठरवले की घरामध्ये गणपती बसवायचा. तसे गावाकडे घरात गणपती बसवण्याची पद्धत नव्हती. परंतु आम्ही हा निर्णय घेऊन गणेशोत्सवाला सुरुवात केली. गेली ३२ वर्ष आम्ही हा आनंद घेत आहोत. दरवर्षी तोच आनंद, तोच उत्साह आणि तीच उमेद घेऊन गणपती बाप्पाचे आम्ही स्वागत करतो. आमच्या कुटुंबासाठी हा चैतन्याचा सोहळा आहे. मी, माझी पत्नी शिला, मुलगा प्रतिक गणपतीची आतुरतेने वाट पहात असतो. मुलगी शितल आणि जावयासह माझे सर्व नातेवाईक, कुटुंबिय या सोहळ्यात आनंदाने सहभागी होतात. - सी. एच. वाकडे (अतिरीक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे)