शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

३५ लाखांची लाच मागणारा अपर जिल्हाधिकारी ताब्यात

By admin | Updated: August 7, 2015 00:06 IST

- नवीन शर्तीचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी

- नवीन शर्तीचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची दिली धमकी
नाशिक : जमीन व्यवहारात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ३५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणारे मालेगावचे अपर जिल्हाधिकारी रामचंद्र बापूराव पवार व त्यांचा खासगी सहकारी दिनेशभाई पंचासरा या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ताब्यात घेतले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी गुरुवारी सकाळी पवार यांच्या शासकीय कार्यालयाला सील ठोकले, तर सायंकाळी मालेगावच्या महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाच्या समोर असलेल्या त्यांच्या निवासाचीही झडती घेऊन तेथून काही कागदपत्रे ताब्यात घेतली.
कासारी (ता. नांदगाव) व नाशिक येथील काही नागरिकांनी नांदगाव तालुक्यातील दोन गावांमधील सुमारे ७५ एकर ८५ गुंठे जमीन खरेदी केली होती. परंतु ही जमीन ही नवीन शर्तींची म्हणजेच मूळ मालकाला शासनाने काही अटी, शर्तींवर दिली होती व अशी जमीन हस्तांतरण करताना विभागीय आयुक्तांची अनुमती घेऊन शासनाच्या तिजोरीत नजराणा भरावा लागतो. परंतु मूळ मालकाने व नंतर जमीन खरेदी करणार्‍या व्यक्तींनी असा व्यवहार करताना कोणतीही अनुमती घेतली नाही, असे पवार यांचे म्हणणे होते व त्यापोटी त्यांनी जमीन खरेदी करणार्‍या व्यक्तींना मे महिन्यात नोटीस बजावून फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचा इशारा दिला होता.
पवार यांचा सहकारी दिनेशभाई लालजीभाई पंचासरा याने २७ मे रोजी जमीन मालकांची भेट घेऊन प्रकरण मिटविण्यासाठी पवार यांनी आपल्याला पाठविल्याचे सांगितले व कारवाई टाळायची असेल तर ५० लाखांची मागणी केली होती. मात्र नंतर ३५ लाख रुपयांवर सौदा ठरला. मात्र या प्रकरणी जमीन मालकांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली.
----
भ्रमणध्वनी संभाषणाचा पुरावा
या गुन्ह्यात भ्रमणध्वनीवरील संभाषण हा मोठा पुरावा ठरला आहे. पवार यांच्यावतीने बोलणी करण्यास आलेल्या दिनेशभाई पंचासरा याने आपल्या भ्रमणध्वनीवरून पवार व जमीनमालकांचे बोलणे करून दिले होते, त्यात पवार यांनी पैशांची मागणी रास्त असल्याचे सांगून ३५ लाखांवर सौदा पक्का केला होता. त्यानंतर पंचासरा व जमीनमालक यांच्यात सातत्याने पैशांच्या देवाण-घेवाणीवरून बोलणे सुरूच होते. जूनमध्ये तीन दिवस सापळा रचूनही पोलिसांना यश आले नाही.
---
काही महिन्यांपूर्वीच मालेगाव येथे दोन लाखांची लाच घेताना प्रांत अधिकार्‍याला रंगेहाथ पकडल्यानंतर आता अपर जिल्हाधिकारीही सापळ्यात अडकले आहेत. गेल्या ऑगस्टमध्ये मालेगाव अपर जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारणारे रामचंद्र पवार हे येत्या दहा महिन्यांत निवृत्त होत आहेत.