शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दोन माजी लष्करप्रमुखांवर ‘आदर्श’ घोटाळ्यात ठपका

By admin | Updated: July 10, 2017 00:20 IST

मुंबईत कुलाबा येथे लष्कराच्या जमिनीवर ‘आदर्श’ सोसायटीची ३१ मजली टोलेजंग निवासी इमारत बांधली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मुंबईत कुलाबा येथे लष्कराच्या जमिनीवर ‘आदर्श’ सोसायटीची ३१ मजली टोलेजंग निवासी इमारत बांधली जाण्याशी संबंधित घोटाळ््यात संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या चोकशी समितीने जनरल एन. सी. विज आणि जनरल दीपक कपूर या दोन माजी लष्करप्रमुखांवर निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला असल्याचे समजते.निवृत्त आयएएस अधिकारी राजन कटोच आणि लेफ्ट. जनरल रवी थोडगे यांच्या चौकशी समितीने त्यांचा १०० पानांचा अहवाल संरक्षण मंत्रालयास सादर कला. याआधी लष्कराच्या पातळीवर ‘कोर्ट आॅफ एन्व्हायरी’ केली होती. त्यातील निष्कर्षांवर या चौकशी अहवालानेही शिक्कामोर्तब झाले.सूत्रांनुसार या अहवालात जनरल विज व जनरल कपूर यांच्यावर ठेपका ठेवण्याखेरीज या प्रकरणात झालेल्या अनेक अनियमितता व गैरव्यवहारांच्या संदर्भात त्यावेळच्या इतरही वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांवर प्रतिकूल शेरे नोंदविण्यात आले. यात जी. एस. सिहोटा, तेजिंदर सिंग आणि शांतनू चौधरी हे तिघे लेफ्ट. जनरल आणि ए. आर. कुमार, व्ही. एस. यादव, टी. के. कौल व आर. के. हुडा यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.या अधिकाऱ्यांनी जबाबदारी पार पाडताना निष्काळजीपणा व कर्तव्यात कसूर केली. त्यामुळे हा घोटाळा होण्यास हातभार लागला. शिवाय लष्करी तळाच्या अगदी शेजारी अशी नागरी इमारत होण्याने राष्ट्रीय सुरक्षेस उद््भवू शकणाऱ्या संभाव्य धोक्याचेही त्यांनी दक्षतेने आकलन केले नाही, असा ठपका अहवालात ठेवण्यात आल्ं़याचे सूत्रांचे म्हणणे आहे.आर्मी अ‍ॅक्टनुसार लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या सेवाकाळात केलेल्या कथित गुन्हेगारी कृत्यांबद्दल कायदेशीर कारवाई करण्यास निवृत्तीनंतर तीन वर्षांची मर्यादा आहे. त्यामुळे ठपका ठेवलेल्या लष्करी अधिकाऱ्यांवर अशी कारवाई करणे शक्य नसले, तरी सरकारने आपली तीव्र नाराजी त्यांना कळवावी व यापुढे कोणत्याही सरकारी पदावर नेमणुकीस त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी शिफारस अहवालात केली आहे, तसेच सुप्रीम कोर्टाकडून अनुमती घेऊन ‘आदर्श’ची इमारत सरकारने ताब्यात घ्यावी व ती लष्करी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी वापरावी, असेही अहवालात सुचविण्यात आले आहे.आतापर्यंत या घोटाळ््याची चर्चा प्रामुख्याने राजकीय नेते व वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी स्वत:च्या लाभासाठी नियम बाजूला ठेवून सोसायटीला कसा फायदा करून दिला यावरच केंद्रीत होती. परंतु लष्करी अधिकाऱ्यांचा सहभागही तेवढाच मोठा होता, हे या चौकशीतून समोर आले आहे.>जनरल एन. सी. विजमोक्याच्या जागीचा हा लष्कराचा भूखंड हातून जातोय, हे जाणवत असूनही त्याकडे कानाडोळा केला.निहित स्वार्थ गुंतलेला असल्याने या इमारतीमुळे असलेल्या संभाव्य धोक्याकडे त्यांनी कधीही लक्ष वेधले नाही.>जनरल दीपक कपूरघोटाळ््यात प्रत्यक्ष सहभाग नाही. तरी सोसायटीचे सदस्यत्वस्वीकारून अयोग्य वर्तन केले.पदावर असताना असे सदस्यत्व स्वीकरण्याच्या योग्या-योग्यतेचे त्यांनी निरपेक्षपणे मूल्यमापन केले नाही.