शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’ कृती पक्षाच्या पथ्यावर नाही?

By admin | Updated: January 20, 2017 04:50 IST

नोटाबंदीच्या मुद्यावरून एकीकडे काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत

व्यंकटेश केसरी,

नवी दिल्ली- नोटाबंदीच्या मुद्यावरून एकीकडे काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत तसेच ऊर्जित पटेल यांच्या राजीनाम्याची मागणीही करीत आहेत, तर संसदीय समितीपुढे ऊर्जित पटेल यांची कोंडी झाली असताना माजी पंतप्रधान मनमोहनसिंग त्यांच्या बचावासाठी पुढे आले. ही कृती पक्षाच्या पथ्यावर पडणार नसल्याचे मत व्यक्त होत आहे. या मुद्यावर अखिल भारतीय काँगे्रस समितीनेही मौन बाळगले आहे, तर याच मुद्यावरून दुसऱ्या दिवशी काँग्रेसचा आक्रमकपणाही कमी झाला आहे. डॉ. मनमोहनसिंग म्हणजे काँग्रेसचा विश्वासार्ह चेहरा आहे. नोटांबदीचा जीडीपीवर होणारा परिणाम, रोजगारात होणारी घट, संसदेच्या आत आणि बाहेरही याबाबत उठविलेला आवाज. नोटाबंदीनंतरचा सर्वात वाईट काळ आणखी येणार आहे, असे वक्तव्यही त्यांनी केले होते. पैसे काढण्यावरील निर्बंध केव्हा उठविणार? यासारख्या प्रश्नांची सरबत्ती ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केली. तेव्हा मनमोहनसिंग यांनी ऊर्जित पटेल यांना असा सल्ला दिला की, नव्या अडचणी उभ्या राहतील अशा प्रश्नांना उत्तरे देऊ नका. आपण अशा प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज नाही. स्थायी समितीचे अध्यक्ष एम. वीरप्पा मोईली हेही दडपणाखाली आल्याने त्यांचीही टोकदार प्रश्न विचारून ऊर्जित पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अडचणीत आणण्याची इच्छा झाली नाही. सरचिटणीस गुलाम नबी आझाद काँग्रेसच्या व्यासपीठावरून विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांतील जनतेला भाजपविरुद्ध मतदान करण्याचे आवाहन करीत असताना या मुद्यांवरून काँग्रेस नेत्यांत मतभेद निर्माण झाले.