भोकारा नाला अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू
By admin | Updated: January 23, 2015 01:04 IST
हायकोर्टात माहिती : दोन आठवड्यांत मागितला अहवाल
भोकारा नाला अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू
हायकोर्टात माहिती : दोन आठवड्यांत मागितला अहवालनागपूर : भोकारा नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला सुरुवात झाली आहे. शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने ४ फेब्रुवारीपर्यंत कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मोहन कारेमोरे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. तहसीलदार (ग्रामीण) शोभाराम मोटघरे यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, भोकारा नाल्याच्या ०.३७ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आढळून आले आहे. अतिक्रमीत भागात दिवंगत माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांची मुलगी मैत्रेयी व मुलगा याज्ञवल्क्य यांच्या नावाने १.०६ हेक्टर (सर्वे क्र. १०३-२) जागा आहे. संतकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, ताजकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था, हिंद हॉटेल आदींच्या नावानेही भूखंड आहेत. भूमी अभिलेख (ग्रामीण) विभागाचे उपाधीक्षक, नायब तहसीलदार (ग्रामीण), महसूल निरीक्षक आदी अधिकाऱ्यांनी ६ जून २०१४ रोजी अतिक्रमणाची चौकशी केली आहे.-----------------चौकटयाचिकाकर्त्याची तक्रारशासकीय अधिकारी व भूमाफिया यांनी मौजा भोकारा येथील नाला बुजवून, त्यावर ले-आऊट पाडून भूखंड विकले आहेत. १७ जून २०१३ रोजी नायब तहसीलदारांनी गोधनी रेल्वेचे मंडळ अधिकारी व भोकाराचे तलाठी यांना नाल्यावरील अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसेच, पोलीस उपायुक्त, ग्रामसेवक व ग्रामपंचायतला पत्र लिहिले होते. परंतु, गेल्या १० वर्षांत काहीच झाले नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.