शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहांची निर्दोष सुटका चिंताजनक

By admin | Updated: December 30, 2014 23:47 IST

भाजपाध्यक्ष अमित शहा यांची निर्दोष सुटका ‘आश्चर्यकारक आणि चिंताजनक’ असल्याचे काँग्रेसने म्हटले असून याप्रकरणी सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़

काँग्रेस : सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, ‘आप’चाही हल्लानवी दिल्ली : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची निर्दोष सुटका ‘आश्चर्यकारक आणि चिंताजनक’ असल्याचे काँग्रेसने म्हटले असून याप्रकरणी सीबीआयच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे़ सीबीआय सरकारच्या दबावाखाली काम करीत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे़काँग्रेस प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी यानिमित्ताने मंगळवारी सरकारवर टीका केली़ अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत़ मॅजिस्ट्रेटसमक्ष कलम १६४ (सीआरपीसी) अंतर्गत दिलेला जबाब, मुंबईच्या न्यायालयात १५ मिनिटांच्या युक्तिवादात सीबीआय वकिलाने यापैकी कशाचाही उल्लेख केला नाही, असे सिंघवी म्हणाले़ बचाव पक्षाच्या वकिलाने शहांच्या बाजूने तीन दिवस युक्तिवाद केला असताना सीबीआयने केवळ १५ मिनिटे युक्तिवाद का करावा़ सीबीआयने याप्रकरणी विशेष सरकारी वकिलाची मदत का घेतली नाही? असे प्रश्न त्यांनी टिष्ट्वटरवर उपस्थित केले़ याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेले आरोपपत्र व न्यायालयासमक्ष केलेला युक्तिवाद यात मोठी तफावत होती, असे आम आदमी पार्टीचे नेते योगेन्द्र यादव यांनी म्हटले आहे.‘आमच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब’बनावट चकमकीप्रकरणी विशेष न्यायालयाने भाजपाध्यक्ष अमित शहा यांची निर्दोष सुटका केल्याची बातमी ऐकून मला आनंद झाला़ आमच्या पक्षाची याबाबतची भूमिका खरी असल्याचे न्यायालयीन निर्णयाने सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी दिली़(लोकमत न्यूज नेटवर्क)नवी दिल्ली : सोहराबुद्दीन बनावट चकमकीप्रकरणी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची निर्दोष सुटका करण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास केल्यानंतरच याविरोधात अपिलात जाण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सीबीआयने स्पष्ट मंगळवारी केले़