शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हे यश क्रिकेटच्या विजयापेक्षाही मोठे

By admin | Updated: September 25, 2014 04:06 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी भारताच्या ऐतिहासिक मंगळ मोहिमेच्या यशाचे साक्षीदार बनले़ इस्रोच्या नियंत्रण कक्षात अनेक शास्त्रज्ञांसोबत ते हजर होते़

बंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी भारताच्या ऐतिहासिक मंगळ मोहिमेच्या यशाचे साक्षीदार बनले़ इस्रोच्या नियंत्रण कक्षात अनेक शास्त्रज्ञांसोबत ते हजर होते़ मंगळ यानाने मंगळाच्या गुरुत्वाकर्र्षण कक्षेत प्रवेश करण्यापूर्वीच्या काही क्षणांची व्याकुळता, थरार असे सर्व त्यांनी अनुभवले़ मोहीम फत्ते झाल्याचे कळताच इस्रोच्या शास्त्रज्ञांशी हस्तांदोलन करून त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले़ यानंतर मंगळ मोहीम यशस्वी झाल्याचे त्यांनी जाहीर केले़ भारतीय क्रिकेट संघ क्रिकेटची एखादी मालिका जिंकतो तेव्हा देशभर जल्लोष होतो़ आजचा हा विजय त्यापेक्षाही हजार पटींनी मोठा आहे़ त्यामुळेच संपूर्ण देशाने तेवढाच मोठा जल्लोष करायला पाहिजे़ आपल्या शास्त्रज्ञांनी आज जे यश गाठले त्याचा प्रत्येक भारतीयाने अभिमान बाळगावा, असे मोदी या वेळी म्हणाले़मंगळ मोहिमेच्या यशासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे सांगत आजचा ऐतिहासिक क्षण संपूर्ण देशाचा ऊर अभिमानाने भरून यावा, असा असल्याचे मोदी या वेळी म्हणाले़ आपल्यासमोर अनेक अडचणी होत्या़ पण त्या पार करीत आपण पहिल्या प्रयत्नात हे यश गाठले़ आज एमओएम (मार्स आॅर्बिटर मिशन)चे मंगळाशी मिलन झाले़ मंगळाला ‘मॉम’ मिळाली़ ज्या मोहिमेचे नाव एमओएम अर्थात मॉम आहे, ते अपयशी ठरणे शक्यच नव्हते़ मॉम आपल्याला निराश करणार नाही, असा मला विश्वास होता, असे ते म्हणाले.