शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

उपसचिव आनंद जोशी यांना अटक स्वयंसेवी संस्थांवर दबाव आणल्याचा आरोप

By admin | Updated: May 17, 2016 06:11 IST

केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव आनंद जोशी यांना सोमवारी सीबीआयने अटक केली

नवी दिल्ली : आर्थिक लाभ पदरात पाडून घेण्यासाठी काही स्वयंसेवी संघटनांना विदेशी निधी नियमन कायद्यांतर्गत (एफसीआरए) नोटिसा पाठवणारे केंद्रीय गृह मंत्रालयाचे उपसचिव आनंद जोशी यांना सोमवारी सीबीआयने अटक केली. त्यांना रविवारी ताब्यात घेत सीबीआयने त्यांची चौकशी सुरू केली होती. ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र त्यांच्या पत्नीचा त्यांना नियमित भेटण्यास जात असल्याचा सुगावा सीबीआयला लागला होता. त्यामुळे त्यांचा पाठलाग करून, दिल्लीच्या टिळक नगर भागातून आनंद जोशी यांना ताब्यात घेण्यात आले होते. तिस्ता सेटलवाड यांच्या सबरंग ट्रस्टसंबंधी फाईल चोरल्याचा तसेच ६० ते ७० स्वयंसेवी संस्थांना नोटिसा पाठवत दबाव आणून आर्थिक लाभ पदरात पाडून घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पद्मश्री विजेत्या पर्यावरणतज्ज्ञ सुनीता नारायण यांच्या सेंटर फॉर सायन्स अ‍ॅन्ड एन्हायर्नमेंट (सीएसई) या स्वयंसेवी संस्थेला गेल्या नोव्हेंबरमध्ये नोटीस पाठवताना जोशी यांनी वरिष्ठांकडून परवानगी घेतली नव्हती. उपरोक्त कायद्याचा दाखला देत त्यांनी नारायण यांना विशिष्ट प्रश्नावलीही पाठविली होती.