शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

दिलासादायक : ‘फेलुदा’ पेपर टेस्टला परवानगी,अवघ्या तासाभरात होणार कोरोनाचे अचूक निदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2020 07:03 IST

तात्काळ, तसेच अचून निदान स्पष्ट करणारी ही तपासणी आहे. आता नागरिकांना कोरोनासंबंधीच्या अहवालाची फार काळ वाट पाहावी लागणार नाही. अवघ्या तासाभरात कोरोनासंसर्गाचे निदान होईल. देशात सध्या कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्ट वापरली जाते.

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) आरटी-पीसीआर, अँटिजन टेस्टसह ‘फेलुदा’ पेपर टेस्टला परवानगी दिली आहे. आयसीएमआरकडून यासंबंधी नियमावली जारी करण्यात आली आहे. 

तात्काळ, तसेच अचून निदान स्पष्ट करणारी ही तपासणी आहे. आता नागरिकांना कोरोनासंबंधीच्या अहवालाची फार काळ वाट पाहावी लागणार नाही. अवघ्या तासाभरात कोरोनासंसर्गाचे निदान होईल. देशात सध्या कोरोनाचे निदान करण्यासाठी आरटीपीसीआर आणि अँटिजन टेस्ट वापरली जाते. अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर ती ग्राह्य आहे; परंतु कोरोना लक्षणे असलेल्यांची अँटिजन टेस्ट निगेटिव्ह असल्यास खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्याला मात्र किमान २४ तास वाट पाहावी लागते. आता फेलुदा टेस्टमुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. 

फेलुदा पेपर स्ट्रीप टेस्ट म्हणजे काय?- फेलुदा पेपर स्ट्रीप टेस्टमध्ये सीआरआयएसपीआर-कॅस ९ तंत्रज्ञानाने कोरोना संसर्गासंबंधी माहिती तासाभरात मिळते. कुठल्याही प्रकारचा रोग पसरण्यापासून रोखण्यासाठी हे तंत्रज्ञान वापरले जाते. - फेलुदा टेस्टच्या अहवालानंतर कोरोनाची फेर पडताळणी करण्यासाठी आरटीपीसीआर तपासणी करण्याची गरज पडत नाही, असा दावा करण्यात आला आहे.- तपासणीतील पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अहवाल हे स्पष्ट असतात. भारताच्या औषध महानियंत्रकांनी या तपासणीच्या वापराला मंजुरी दिल्यानंतर ही नियमावली तयार करण्यात आली आहे. 

आयसीएमआरची नियमावली - कोरोनाच्या निदानासाठी फेलुदा पेपर स्ट्रीप टेस्टचा वापर सुरक्षित आहे. - तपासणीतील पॉझिटिव्ह, तसच निगेटिव्ह अहवाल विश्वासार्ह आहेत. - कोरोना तपासणी करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळांमध्ये फेलुदा तपासणी केली जाईल. - तपासणीसाठी वेगळ्या परवानगीची आवश्यकता नाही.- आरटीपीसीआर, सीआरआयएसपीआर, ट्युनेट, सीबीनॅटसाठी दिले जाणारे कोणेतेही प्रिस्क्रिब्शन सारखेच असेल. - टेस्टच्या प्रकारानुसार संपूर्ण माहिती आयसीएमआरच्या कोरोनासंबंधित वेब पोर्टलवर अपलोड केली जाईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याMedicalवैद्यकीयdocterडॉक्टर