शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतींची निवडणूक होणार १९७१ च्या जनगणनेनुसार

By admin | Updated: May 30, 2017 01:33 IST

भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाची यंदाची निवडणूक ४६ वर्षे जुन्या म्हणजे १९७१ च्या लोकसंख्येच्या प्रमाणातच जुलैमध्ये होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : भारताच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाची यंदाची निवडणूक ४६ वर्षे जुन्या म्हणजे १९७१ च्या लोकसंख्येच्या प्रमाणातच जुलैमध्ये होणार आहे. देशातील अनेक राज्यांना त्यामुळे सध्याच्या लोकसंख्येनुसार मतदानाच्या मूल्यांकनात प्रतिनिधित्व मिळणार नाही, असे राज्यघटनेच्या जाणकारांचे मत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आमदार, खासदारांना मतदानाचा अधिकार असतो. आमदारांच्या मतांचे मूल्य राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ठरते. विधानसभेच्या एकूण जागांनी राज्याच्या लोकसंख्येला भागल्यानंतर जी संख्या येते, त्याचा भागाकार पुन्हा १ हजारांनी केल्यानंतर जी संख्या येते ते त्या आमदाराच्या मताचे मूल्यठरते.खासदारांचे मतमूल्य जरी समान असले, तरी प्रत्येक राज्यातील आमदारांच्या मतांचे मूल्य भिन्न आहे. २0११ च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या १२१.0१ कोटी होती. ती २0१७ साली १२८ कोटींवर गेल्याचा अंदाज आहे. मात्र, राष्ट्रपती ४६ वर्षे जुन्या ५४.८१ कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात तयार झालेल्या निर्वाचक मंडळाद्वारेच निवडले जातील.राज्यघटनेचे विशेषज्ञ सुभाष कश्यप यांच्या मते राष्ट्रपतीपदाच्या यंदाच्या निवडणुकीसाठी जनगणनेचे आधार वर्ष १९७१ ऐवजी २0११ केले, तर गेल्या ४0 वर्षांत वाढलेली देशाची लोकसंख्या लक्षात घेता आमदारांच्या मताचे मूल्य व एकूण मतदानात त्यांची हिस्सेदारी अनेक पटींनी वाढेल.मात्र, १९७१ च्या जनगणनेनुसार होणाऱ्या निवडणुकीत अनेक राज्यांना विद्यमान लोकसंख्येच्या प्रमाणात मतदानाच्या मूल्यांकनात प्रतिनिधित्व मिळणारनाही.२0२६ पर्यंतच्या सर्व निवडणुका १९७१ च्या जनगणनेनुसारच पहिल्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक १९५२ साली १९५१ च्या लोकसंख्येनुसार झाली. पुढे १९६१ साली जनगणनेची आकडेवारी वेळेवर न मिळाल्याने १९६२ सालची राष्ट्रपतीपदाची निवडणूकही १९५१ च्या लोकसंख्येच्या आधारेच झाली. त्यानंतर १९७१ च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ८0 च्या दशकापासून राष्ट्रपतीपदाची निवडणूक संपन्न होत आली आहे.वाजपेयींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार २00२ साली सत्तेवर असताना एक घटनादुरुस्ती झाली. या दुरुस्तीद्वारे निश्चित करण्यात आले की, २0२६ पर्यंतच्या राष्ट्रपतीपदाच्या सर्व निवडणुका १९७१ च्या जनगणनेनुसारच होतील. दक्षिणेकडील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम राबवल्याने हा निर्णय घेण्यात आला.